घरटेक-वेकआता घरबसल्या घ्या 'मंगळ' ग्रहाचे दर्शन

आता घरबसल्या घ्या ‘मंगळ’ ग्रहाचे दर्शन

Subscribe

मंगळ मोहिमेसाठी अनेक देशांची धडपड सुरु आहे. भारतही या स्पर्धेत आहे. दरम्यान नासाने त्यांचे मंगळग्रहावरील स्पेसक्राफ्ट ५ मे रोजी मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले. आता तब्बल ६ महिन्याच्या प्रवासानंतर हे अंतराळयान मंगळावर पोहोचणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या मोहिमेकडे लागले आहे.

पृथ्वीपासून दूर असलेल्या ग्रहांचे फोटो आपण अनेकदा पाहिले आहेत. नासा, इस्रोच्या चांद्रमोहिमा ते अगदी मंगळ मोहिमेपर्यंतचे कैक अपडेट आपण चित्रस्वरुपात घेत असतो. पण आता लालबुदं अशा मंगळग्रहाचे दर्शन आपल्याला घरबसल्या करता येणार आहे. विशेष म्हणजे नासा ही संधी आपल्याला उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे तुम्हाला नासाच्या सगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर मंगळ ग्रहाचे दर्शन होणार आहे. ही संधी युट्युब युजर्सनादेखील मिळणार आहे.

कसे होईल मंगळ ग्रहाचे दर्शन? 

नासाची मिशन टू मार्स ही मोहिम सुरु आहे. येत्या २६ नोव्हेंबरला नासाचे इनसाईट हे स्पेसक्राफ्ट मंगळावर उतरणार आहे. ही सगळी लाईव्ह दृश्य नासाच्या टिव्हीवर पाहता येणार आहे. या संदर्भातील तब्बल ८० लाईव्ह इव्हेंट नासाकडून जगभरात आयोजित केले जाणार आहेत. भारतीय वेळेनुसार हा सगळा लाईव्ह सोहळा आपल्याला २७ नोव्हेंबरच्या रात्री १ वाजून ३० मिनिटांनी पाहता येणार आहे, अशी माहिती नासाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -
वाचा- मंगळ अभियानात नासाला येणार ‘या’ अडचणी

५ मे रोजी झेपावले अंतराळात

मंगळ मोहिमेसाठी अनेक देशांची धडपड सुरु आहे. भारतही या स्पर्धेत आहे. दरम्यान नासाने त्यांचे मंगळग्रहावरील स्पेसक्राफ्ट ५ मे रोजी मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले. आता तब्बल ६ महिन्याच्या प्रवासानंतर हे अंतराळयान मंगळावर पोहोचणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या मोहिमेकडे लागले आहे. विशेष म्हणजे नासाने या आधी क्युरोसिटी रोव्हर २०१२ साली मंगळग्रहावर पाठवले होते. ज्यामुळे मंगळ ग्रह समजण्यास मदत झाली होती.

वाचा- युरेका ! मंगळावर बर्फाच्या स्वरूपात पाणी

- Advertisement -

मंगळावर कधी जाणार मानव ?

मंगळाच्या अभ्यास करताना आतापर्यंत स्पेसक्राफ्ट मोहीमाच आखल्या गेल्या आहेत. पण आता मानवसहित मंगळ मोहिम कोण देश आखेल? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -