OnePlus 7 Pro ची प्री-बुकींग फक्त १००० रूपयांत

OnePlus 7 Pro ला भारतात १४ मे रोजी लॉन्च करण्यात येणार आहे.

Mumbai

चीनची कंपनी OnePlus आपल्या पुढच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 7 Pro ला भारतात १४ मे रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. त्यामुळे आताच या स्मार्ट फोनची प्री बुकींग भारतात सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी कंपनीने इच्छुक ग्राहक Amazon India च्या वेबसाइटवर जाऊन OnePlus 7 Pro ची प्री-बुकींग करू शकतात, अशी घोषणा केली.

OnePlus 7 प्रो ची प्री-बुकींग शुक्रवार पासून सुरू झाली आहे. ग्राहकांना प्री-बुकींग केल्यावर १५,००० रुपयांची स्क्रीन रिप्लेसमेंटची गॅरंटी मिळणार आहे. सध्या अॅमेझॉनवर OnePlus 7 Pro ची प्री-बुकींग प्राइम मेंबर्सकरिता सुरू करण्यात आलेली आहे, ४ मे पासून सर्व यूजर्सकरिता सुरू करण्यात येणार आहे.

या स्मार्ट फोनच्या प्री बुकींगकरिता कंपनीने एसबीआयच्या क्रेडीट किंवा डेबिट कार्डने सुद्धा फोन बुक करण्यासाठी ग्राहकांना सूट मिळणार आहे. तसेच कंपनीने ग्राहकांच्या सोयीसाठी असे ही सांगितले की, OnePlus 7 Pro की प्री-बुकींग वनप्लस स्टोअर, क्रोमा आणि रिलायंस डिजिटल स्टोअर्स ८ मे पासून होणार आहे. OnePlus 7 प्रो ची प्री बुकींग करणाऱ्या ग्राहकांना १००० रूपयाचे OnePlus 7 सिरीज अॅमेझॉनवर गिफ्ट कार्ड ८मे पुर्वी खरेदी करावे लागणार आहे.

कंपनी १४ मे रोजी एक इव्हेंट आयोजित करणार आहे. त्यात OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro स्मार्टफोनली लॉन्च करण्याची शक्यता आहे.