घरटेक-वेकOnePlus 8T मध्ये मिळू शकतो 65W Warp Charge सपोर्ट, १४ ऑक्टोबरला होणार...

OnePlus 8T मध्ये मिळू शकतो 65W Warp Charge सपोर्ट, १४ ऑक्टोबरला होणार लाँच

Subscribe

वनप्लस ८ टी(OnePlus 8T)शी संबंधित अनेक फिचर्स आतापर्यंत समोर आले आहेत. त्याचबरोबर कंपनीने टीझरद्वारे येणाऱ्या स्मार्टफोन वनप्लस ८ टी मध्ये ड्यूल सेल चार्जिंग सिस्टमसह यामध्ये नवीन Warp Charge तंत्रज्ञान वापरणार आहे. हा स्मार्टफोन 65W Warp Charge तंत्रज्ञानासह बाजारपेठेत उपलब्ध होईल. यापूर्वी हे तंत्रज्ञान वनप्लसची सहाय्यक कंपनी ओप्पो (Oppo)ने सादर केले आहे.

वनप्लसच्या वेबसाईटवर दिल्या गेलेल्या लँडिंग पेजवर वनप्लस ८ टी लाँच इंविटेशन दिले गेले आहे. तिथे ड्यूल सेल चार्जिंग सिस्टम दर्शविले जात आहे. हे पाहून असा अंदाज बांधता येता की, या स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला गेला आहे. याशिवाय वनप्लस ८टीमध्ये अल्ट्रा फास्ट चार्जिंग सपोर्ट व्यतिरिक्त अल्ट्रा स्मूथ स्क्रॉलिंगपण उपलब्ध असेल, अशी वेबसाईटवर हिंट दिली आहे.

- Advertisement -

वनप्लस ८ टीपूर्वी पहिल्यांदा dual-cell 65W फास्ट चार्जिंग सिस्टम ओप्पोच्या स्मार्टफोन फाइंड एक्स२ (Find X2) मध्ये पाहिले आहे. हा स्मार्टफोन 65W SuperVOOC 2.0 सपोर्टसह लाँच करण्यात आला होता आणि ३८ मिनिटांत तो १०० टक्के चार्ज होऊ शकतो, असा कंपनीचा दावा आहे. आता लवकरच हे तंत्रज्ञान वनप्लस ८ टीमध्येही दिसणार आहे.

वनप्लस ८ टी अपेक्षित किंमत

वनप्लस ८ टी बद्दल उघडकीस आलेल्या लीक्सनुसार या स्मार्टफोनच्या 8GB + 128GB मॉडेलची किंमत EUR 599 च्या आसपास असू शकते म्हणजेच सुमारे ५१ हजार ७०० रुपये आणि 12GB + 256GB मॉडेलची किंमत EUR 699 म्हणजेच सुमारे ६० हजार रुपये किंमत असू शकते. तथापि, कंपनीकडून अद्याप याबाबत खुलासा झालेला नाही.

- Advertisement -

वनप्लस ८ टीची संभाव्य फिचर्स

वनप्लस ८ टीला Qualcomm Snapdragon 865+ प्रोसेसरसह लाँच केले जाऊ शकते. यात 120Hz रिफ्रेश रेटसह ६.५५ इंचाचा डिस्प्ले दिला असेल. फोटोग्राफीसाठी क्वाड रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. फोनचा प्राइमरी सेंसर 48MP असू शकतो. तर 16MPचा सेकेंडरी सेंसर, 5MPचा मॅक्रो लेंस आणि 2MPचा पोट्रेट सेंसर दिले जाऊ शकतात. फोनमध्ये 16MPचा फ्रंट कॅमेरा असेल. पॉवर बॅकअपसाठी 4,500mAh बॅटरी उपलब्ध असू शकते.


हेही वाचा – Samsung Galaxy S20 FE स्मार्टफोन झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -