भारतात One Plus कंपनीला ५ वर्ष पुर्ण; One Plus च्या ‘या’ फोनवर ऑफर

५ वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीकडून एका स्पेशल सेलचे आयोजन

Mumbai
one plus door step service
OnePlus

स्मार्टफोन तयार करणारी चीनची कंपनी वनप्लसला भारतात ५ वर्ष पुर्ण झाले आहे. यानिमित्ताने कंपनीकडून स्मार्टफोन आणि टेलिव्हिजन सारख्या वनप्लस उत्पादनावर ऑफर देण्यात आली आहे. ५ वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीकडून एका स्पेशल सेलचे आयोजन करण्यात आले आहे. कंपनीकडून देण्यात आलेल्या ऑफरमध्ये कंपनीने ग्राहकांसाठी ३ हजारांची सूट देण्यात आली आहे तर ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपनीकडून देखील डेबिट-क्रेडीट कार्डच्या वापरावर ५ हाजारांची सूट देण्यात आली आहे.

OnePlus 7 Pro या स्मार्टफोनला ६ महिन्यापर्यंत नो कॉस्ट EMI वर देखील खरेदी करता येणार आहे. सवलतीवर मिळणारा वनप्लस हा दूसरा स्मार्ट फोन असणार आहे. अॅमेझॉनवर मिळणारी ही ऑफर २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत असणार आहे.

कंपनीकडून मिळणार या मॉडेलवर ऑफर

OnePlus 7 Pro

या स्मार्टफोनची किंमत सुरूवातीला ४४ हजार ९९९ रूपये इतकी होती मात्र, या ऑफरच्य़ा माध्यमातून हा फोन ३९ हजार ९९९ रूपयांत मिळणार आहे. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी रोम असलेल्या व्हेरिएंट असणारा मोबाईल फोनवर ३ हजारांची सवलत देण्यात आली आहे. तर एचडीएफसीचे डेबिट कार्ड आणि क्रेडीट कार्ड वापरून पेमेंट केल्यास २ हजारांपर्यंत कॅशबॅक ग्राहकांना मिळणार असून फोन एक्सेंजवर देखील ७ हजारांची सूट कंपनीकडून मिळणार आहे.

OnePlus 7T

OnePlus 7T च्या नुकत्य़ाच लाँच झालेल्या फोनची किंमत ३७ हजार ९९९ इतकी होती मात्र कंपनीकडून देण्यात आलेल्या ऑफरमार्फत हा फोन ३४ हजार ९९९ हजार रूपयांनी मिळणार आहे. एचडीएफसीचे डेबिट कार्ड आणि क्रेडीट कार्ड वापरून पेमेंट केल्यास १५०० रूपयांपर्यंत कॅशबॅक ग्राहकांना मिळणार आहे.


सावधान! स्मार्टफोनमधील ‘हे’ Android apps ठरू शकतात धोकादायक