घरटेक-वेक'OnePlus' च्या नव्या फोनमध्ये 5G इंटरनेट

‘OnePlus’ च्या नव्या फोनमध्ये 5G इंटरनेट

Subscribe

5जी ची सुविधा असलेले वनप्लसचे पुढील स्मार्टफोन्स हे OnePlus  6T च्या तुलनेत २००-३०० अमेरिकन डॉलर्सने महाग असू शकतात.

स्मार्ट फोनच्या दुनियेत OnPlus या कंपनीने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘वन प्लस’च्या पहिल्या स्मार्टफोनपासून ते सध्या बाजारात सर्वाधिक मागणी असलेल्या OnePlus 6T या फोनपर्यंत, कंपनीने नेहमीच आपल्या ग्राहकांना समाधानकारक रिझल्ट दिला आहे. त्यामुळे भारतीय बाजारातही वनप्लसच्या स्मार्टफोन्सना खूप मागणी आहे. दरम्यान, OnePlus कंपनी त्यांच्या पुढच्या फ्लॅगशिपला 5G फिचरसोबत लाँच करणार आहे. त्यामुळे वनप्लसच्या या पुढच्या सर्व मॉडेल्समध्ये 5G इंटरनेट सेवा इनबिल्ट उपलब्ध असेल. कंपनीचे संस्थापक पेटे लाउ यांनी अमेरिकेच्या हवाई शहरात याबाबतची अधिकृत घोषणा केली. याविषयी माहिती देताना ते म्हणाले की, OnePlus चा पुढील स्मार्टफोन Snapdragon 855 प्रोसेसरसोबत येणार आहे. या परिषदेत Snapdragon 855 हे प्रोसेसर लाँच करण्यात आले आहे. त्यामुळे इथून पुढे बाजारात येणाऱ्या वनप्लसच्या प्रत्येक स्मार्टफोनध्ये ५जी इंटरनेट सेवा उपलब्ध असणार आहे.

 

- Advertisement -


किंमतीत काय फरक? 

हवाईतील परिषदेमध्ये पेटे लाउ यांनी 5G सेवा असलेल्या फोनच्या किंमती बाबतही खुलासा केला. लाउ यांनी सांगितल्यानुसार, 5जी ची सुविधा असलेले वनप्लसचे पुढील स्मार्टफोन्स हे OnePlus  6T च्या तुलनेत २००-३०० अमेरिकन डॉलर्सने महाग असू शकतात. म्हणजेत भारतीय चलनानुसार या फोनची किंमत OnePlus  6T च्या आताच्या किमतीपेक्षा १४ ते २१ हजार रुपयांनी जास्त असू शकते.  सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत OnePlusच्या नव्या फोनमध्ये अनेक आधुनिक बदल करण्यात येणार असल्यामुळे, तो  कमी किमतीत बनवता येणे शक्य नसल्याचं, लाउ यांनी यावेळी स्पष्ट केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -