घरटेक-वेकवनप्लसने भारतात लाँच केल्या तीन नव्या स्मार्ट टीव्ही

वनप्लसने भारतात लाँच केल्या तीन नव्या स्मार्ट टीव्ही

Subscribe

वनप्लसने भारतात तीन नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केल्या आहेत. या टीव्हींच्या किंमती १२,९९९ रुपयांपासून सुरू होतात. आता कंपनी आपल्या स्वस्त स्मार्ट टीव्हीद्वारे शाओमी आणि रियलमीला भारतात टक्कर देत आहे. वनप्लस टीव्ही यू१, वनप्लस टीव्ही वाय-सीरिज, वनप्लस टीव्ही ४-सीरिज अशा तीन व्हेरिएंट्समध्ये टीव्ही लाँच केल्या आहेत.

व्हेरिएंट्स आणि किंमत

वनप्लस टीव्ही यू१, ५५ इंची किंमत 49,999 रुपये आहे.

- Advertisement -

वनप्लस टीव्ही वाय-सीरिज, ३२ इंची किंमत १२,९९९ रुपये आहे.

वनप्लस टीव्ही ४-सीरिज, ४३ इंची किंमत २२,९९९ रुपये आहे.

- Advertisement -

वनप्लस टीव्हीच्या या तीन मॉडेल्समध्ये काय आहे खास?

वनप्लस टीव्ही यू १ मध्ये वनप्लस सिनेमॅटिक डिस्प्ले देण्यात आला आहे. शिवाय, 4K रिझोल्यूशन देण्यात आला आहे. यामध्ये ९० टक्के डीसीआय पी३ देण्यात आला आहे आणि कंपनीने गामा इंजिन देखील वापरलं आहे. या टीव्हीला डॉल्बी व्हिजन देण्यात आला आहे. चांगल्या ऑडिओ अनुभवासाठी कंपनीने त्यात 30W उच्च दर्जाचे स्पीकर्स वापरले आहेत, असं कंपनीने म्हटलं आहे. वनप्लसच्या नवीन टीव्ही रेंजमध्ये HDR 10, HDR 10+ आणि HLG सपोर्ट देण्यात आला आहे. त्यात गामा इंजिन देण्यात आल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -