फेस्टिव्हल सेलच्या पूर्वीच OnePlus Nord चा नवा वेरिएन्ट होणार लाँच; जाणून घ्या किंमत

जाणून घ्या OnePlus Nord चे स्पेसिफिकेशन्स...

OnePlus Nord चा नवा ‘Gray Ash’ व्हेरिएंट भारतात लाँच झाला आहे. यावर्षी हा फोन जुलैमध्ये लाँच झाला होता. त्यावेळी हा फोन ब्लू मार्बल आणि ग्रे ऑनिक्स रंगात उपलब्ध होता. मात्र आता ग्रे ऐश व्हेरिएंट फेस्टिव्हलपूर्वी लाँच करण्यात आला आहे. जेणेकरून ग्राहकांकडे अधिक पर्याय असतील. वनप्लस नॉर्ड ग्रे अ‍ॅश मॉडेलला नवीन फिनिश देण्यात आले असून सध्या त्याचे 12 जीबी + 256 जीबी व्हेरिएंटसाठी लाँच करण्यात आले आहे.

या व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे. तर फोनच्या 6 जीबी + 64 जीबी व्हेरिएंटची सध्याची किंमत भारतात 24,999 रुपये आहे आणि 8 जीबी + 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 27,999 रुपये आहे. आधीपासूनच उपलब्ध असलेल्या ब्लू मार्बल आणि ग्रे ऑनिक्स व्हेरिएंटसह नवीन रंग रूपात हा फोन उपलब्ध असणार आहे.

वनप्लस नॉर्डचे नवीन रंग असणारा वेरिएंट अमेझॉन इंडिया आणि वनप्लसच्या वेबसाइटवरून खरेदी करता येणार आहे. 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजेपासून ही खरेदी करता येईल, अशी माहिती कंपनीने आपल्या वेबसाइटवर दिली आहे.

OnePlus Nord चे स्पेसिफिकेशन्स

वनप्लस नॉर्डचे स्पेसिफिकेशन्स फोनच्या इतर कलर वेरिएंट्सप्रमाणेच आहेत. यात अँड्रॉइड 10-आधारित ऑक्सिजन ओएस 10.5, 6.44-इंच फुल-एचडी + (1,080×2,400 पिक्सल) फ्ल्युड एमोलेड डिस्प्ले, ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 765 जी प्रोसेसर आणि 12 जीबी पर्यंत रॅम देखील असणार आहे. याशिवाय यात 48 एमपी प्राइमरी कॅमेरासह क्वाड रियर कॅमेरा सेटअप, 32 एमपी प्राइमरी कॅमेरासह ड्युअल सेल्फी कॅमेरा सेटअप, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि 4,115 एमएएच बॅटरीसह Warp Charge 30T फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीसह हा फोन उपलब्ध आहे.