घरटेक-वेकआयडिया सुचवा आणि OnePlus फ्री मिळवा!

आयडिया सुचवा आणि OnePlus फ्री मिळवा!

Subscribe

OnePlus कंपनीकडून युझर्सना OxygenOS या नव्या व्हर्जनसाठी नवीन फिचर्स सुचवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

स्मार्टफोन निर्मिती क्षेत्रातील  अग्रगण्य कंपनीने त्यांच्या फोरमवर एक नवीन चॅलेंज सुरु केलं आहे. या चॅलेंजनुसार वनप्लसकडून युझर्सना 
मात्र, यासाठी युझर्सना त्यांच्या आयडियाजने कंपनीला पूर्णपणे आश्वस्त करावे लागेल. तसंच फिचर फ्लोसह तयार केलेल्या फिचर्सचा स्केचेसही उपलब्ध करुन द्यावी लागतील. इच्छुकांना २२ फेब्रुवारीपूर्वी Tech section नुसार आपल्या आयडिया कंपनीकडे सुपूर्त कराव्या लागतील. सोबतच #PMChallenge सह कंपनीने विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरंही द्यावी लागतील. यामध्ये ‘फिचरचा वापर करणारे युझर्स कोण असतील? फिचरची फंक्शन्स कशी काम करतील? अशाप्रकारचं एखादं फिचर आधीच उपलब्ध असल्यास त्याच्या तुलनेत तुमच्या फिचरमध्ये काय नवीन आहे? अशाप्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात.


या चॅलेंजसाठी OnePlus ने युझर्ससाठी एक प्रिन्सिपल डिझाईनही उपलब्ध करुन दिला आहे. यामुळे कंपनीला नक्की कशाची अपेक्षा आहे? हे युझरला कळेल. OnePlus च्या अधिकृत वेबसाईटवर याविषयीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, युझर्सनी दिलेल्या आयडीयाजपैकी निवडक आयडीयांचं कंपनी सर्वप्रथम परिक्षण करेल. त्यानंतर ज्या युझरचे फिचर्स कंपनीच्या सर्व मापदंडांवर खरे उतरले तर मार्च महिन्यात त्याविषयी अधिकृत घोषणा केली जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -