घरटेक-वेकशाओमीन नंतर आता ओप्पोचा फ्लॅश सेल

शाओमीन नंतर आता ओप्पोचा फ्लॅश सेल

Subscribe

शाओमीन नंतर आता ओप्पोने देखील फ्लॅश सेलचं आयोजन केलं आहे. ओप्पो के ३ हा ओप्पो कंपनीचा स्मार्टफोन भारतीय बाजारात आला आहे. आज ओप्पो के ३ हा स्मार्टफोन खरेदी करण्याची सुर्वणसंधी ओप्पो कंपनीने दिली आहे. अॅमेझॉन संकेस्थळावर हा नवीन ओप्पो के ३ स्मार्टफोन आज दुपारी १२ वाजेपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. भारतीय बाजारात या स्मार्टफोनची स्पर्धा ही रेडमी के २०, सॅमसंग गॅलेक्सी M40 आणि विवो V15 या स्मार्टफोन सोबत आहे. या फोनमध्ये Game boost 2.0 आणि VOOC फ्लॅश चार्ज 3.0 यांसारखे प्री-लोडेड फीचर्स आहेत. तसेच हा फोन दोन पर्यायांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. पहिला पर्याय 6GB Ram + 64GB आणि दुसरा पर्याय हा 8GB RAM + 128GB असे दोन पर्याय असणार आहेत.

फिचर्स

६.५ इंच फुल HD+ AMOLED डिप्ले
क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७१० प्रोसेसर
अँड्रॉइड ९.० ऑपरेटिंग सिस्टिम
बॅटरीचा क्षमता 3,765mAh
VOOC 3.0 फ्लॅश चार्ज
ड्युअल क‌ॅमेरा स्टेटअप (पहिला क‌ॅमेरा १६ मेगापिक्सल, दुसरा कॅमेरा २ मेगापिक्सल)
१६ मेगापिक्सल सेल्फीसाठी विथ मोटोराइज्ड पॉप-अप कॅमेरा
कनेक्टिव्हिटीसाठी 4g LDE, वाय-फाय, ब्लू-टूथ, जीपीएस/ ए जीपीएस आणि युएसबीचा पर्याय

- Advertisement -

ऑफर्स

१६ हजार ९९० रुपयांना 6GB रॅम असलेल्या व्हेरिअंटची किंमत असून १९ हजार ९९० रुपयांना 8GB रॅम असलेल्या व्हेरिअंटची किंमत आहे. हा फोन खरेदी करताना अॅमेझॉन पे वरून पेंमेट केल्यास १ हजार रुपये कॅशबॅक मिळू शकतो. रिलायंस जिओकडून या फोनच्या खरेदीवर ७ हजार ५० रुपयांचा व्हाउचर दिले जाणार आहे. तसेच अॅक्सिस बँकेच्या कार्डवर १ हजाप रुपयांची ऑफर आहे. हा फोन जेड ब्लॅक आणि अॅरॉर ब्ल्यू या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -