घरटेक-वेकOppo Find X: पॉप-अप कॅमेरांचा फोन

Oppo Find X: पॉप-अप कॅमेरांचा फोन

Subscribe
तुम्हीही नव्या फोनच्या शोधात आहात का? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये  Oppo कंपनीने एक नवा दमदार फोन लाँच केला आहे. Oppo Find X असं या नव्या फोनचं नाव असून गुरुवारी हा फोन लाँच झाला. Find X फोनचं मुख्य आकर्षण आहे फोनला बसवण्यात आलेले तीन पॉपअप कॅमेरे. त्यापैकी २ बॅक कॅमेरे (प्रत्येकी २५ मेगापिक्सल आणि २० मेगापिक्सल) तर १ फ्रंट कॅमेरा (१६ मेगापिक्सल) आहे. तिनही कॅमेरे पॉप-अप प्रकारातील आहेत. पॉप-अप कॅमेरांचं वैशिष्ट्य म्हणजे, ज्यावेळी तुमचा फोन बंद होईल किंवा कॅमेरा मोड बंद कराल तेव्हा हे तिनही कॅमेरे आपोआप आतमध्ये जातील. ज्यावेळी तुम्हाला कॅमेरा वापरायचा असेल त्यावेळी हे कॅमेरे पॉप-अप होतील अर्थात बाहेर येतील. थोडक्यात जेव्हा हे तिनही कॅमेरे वापरात नसतील तेव्हा ते फोनच्या बॉडीमध्ये लपलेले असतील. Find X फोनचं हे स्पेशल फिचर नक्कीच ग्राहकांना आकर्षित करणारे आहे. हा फोन सध्या फ्लिपकार्ट वेबसाईटवर ५९ हजार ९९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे.
oppo find x features

Find X चे फीचर्स थोडक्यात:

  • ८ जीबी रॅम तर २५६ जीबी मेमरी स्टोरेज
  • 3D फेस रेकगनायझेशन
  • २.८ क्वार्ड कोर आणि १.८ क्वार्ड कोर असे दोन प्रोसेसर
  • ३७३० MAH क्षमतेची बॅटरी
  • ६.४ इंचाचा HD डिस्प्ले
  • गोरीला ग्लासची सुरक्षा

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -