OPPOचा ‘हा’ स्मार्टफोन भारतात झाला स्वस्त, लवकर करा खरेदी

oppo reno 3 pro price in india dropped permanently check new rate
OPPOचा 'हा' स्मार्टफोन भारतात झाला स्वस्त, लवकर करा खरेदी

भारतात ओप्पो कंपनीच्या OPPO Reno3 Pro स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. ही माहिती ९१ मोबाईल्स रिटेलच्या सुत्रांच्या माध्यमातून समोर आली आहे. ओप्पोने या फोनच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमती २ हजार रुपयांनी कमी केली आहे. OPPO Reno3 Pro या स्मार्टफोनची किंमत कमी केल्यानंतर २७ हजार ९९० रुपयांन ऐवजी २५ हजार ९९० रुपये झाली आहे. या नव्या किंमतीसह हा स्मार्टफोन ऑफलाईन रिटेल स्टोर्ससह Amzoneवर उपलब्ध आहे.

दरम्यान Amzoneवर OPPO Reno3 Pro च्या 256GB स्टोरेज व्हेरिएंटची आता विक्रीची किंमत ३२ हजार ९९० रुपयांऐवजी २९ हजार ९८९ रुपयांत केली जाणार आहे. पण सध्या ही कायमची किंमत असणार आहे की नाही याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही आहे. तथापि, ही कायम किंमत आहे की मर्यादित कालावधीची ऑफर आहे हे देखील स्पष्ट झाले नाही आहे.

OPPO Reno3 Pro या स्मार्टफोनमध्ये ऑरोर ब्लू, मिडनाइट ब्लॅक आणि स्काई व्हाईट या तीन कलरच्या ऑप्शनमध्ये येतो. तसेच खास गोष्ट अशी आहे की, या स्मार्टफोनच्या फ्रंटला सेल्फीसाठी 44MP आणि 2MP असे दोन कॅमेरे दिले आहेत. तसेच हा स्मार्टफोन अँड्राइ़ड १० बेस्ड ColorOS 7 चालतो. यामध्ये 6.4 इंच फूल HD+ (1,080×2,400) सुपर AMOLED डिस्प्ले दिला गेला आहे. यामध्ये 8GB रॅमसह ऑक्टा-कोर MediaTek Helio P95 प्रोसेसर मिळत आहे. तसेच फोटोग्राफीसाठी यामध्ये रिअरमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64MP चा असून 13MP टेलीफोटो कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 2MP मोनो सेंसर दिला आहे. याची बॅटरी 4,025mAh असून यामध्ये 30W VOOC Flash Charge 4.0 टेक्नोलॉजीचा सपोर्ट मिळतो आहे. याची इंटरनल मेमोरी 256GB पर्यंत आहे.


हेही वाचा – भारतात Mi True Wireless Earphones 2 लवकरच लाँच होणार