घरटेक-वेकमोदींचे तरुणांना 'आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंज'

मोदींचे तरुणांना ‘आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंज’

Subscribe

देशाला डिजिटल आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक पाऊल पुढे टाकत ‘आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंज’ लाँच केले आहे. या चॅलेंजमध्ये तरुणांना २० लाख रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. याबाबतची माहिती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली आहे. हे चॅलेंजला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे. यामध्ये फोटो एडिटिंग पासून गेमिंग Appsपर्यंतचे वेगवेगळे चॅलेंज आहेत.

हे चॅलेंज निती आयोगने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि अटल इनोव्हेशन मिशनच्या अंतर्गत लाँच केले आहे. ‘आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंज’ मध्ये मोबाईल गेम्स, सोशल मीडिया आणि फोटो-व्हिडिओ एडिटिंग Apps तयार करावे लागतील. या चॅलेंजसाठी जास्तीत जास्त २० लाख रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. या Appला मेक इन इंडिया फॉर इंडिया अँड वर्ल्ड’ नाव दिले आहे. मेक इन इंडिया Apps तयार करण्यासाठी लोकांना प्रेरित करण्याचे उद्दीष्ट आहे.

- Advertisement -

याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करताना लिहिले आहे की, ‘जर तुमच्याकडे अशी उत्पादने असतील किंवा तुम्हाला असे उत्पादन तयार करण्याची दृष्टी आणि कौशल्य असेल असे वाटत असेल तर हे चॅलेज तुमच्यासाठी आहे.’ मोदींनी यात सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.

- Advertisement -

जर तुम्हाला या चॅलेंजमध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला innovate.mygov.in या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. येथे रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख १० जुलै आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशनची तपासणी केली जाईल आणि ही प्रक्रिया २० ते २४ जुलै दरम्यान सुरू राहिलं. त्यानंतर २७ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत मूल्यांकन होईल.


हेही वाचा – कॅम स्कॅनरची जागा घेण्यासाठी आला मेड इन इंडिया अ‍ॅप


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -