घरटेक-वेकभारतात पहिल्यांदाच लाँच होणार पोको कंपनीचा स्वतंत्र स्मार्टफोन...

भारतात पहिल्यांदाच लाँच होणार पोको कंपनीचा स्वतंत्र स्मार्टफोन…

Subscribe

लवकरच पोको कंपनीचा 'Poco X2' हा नवा बँड ग्राहकांच्या भेटीस येणार आहे.

पोको कंपनीचा ‘Poco X2’ हा नवा ब्रँड लवकरच भारतात पहिल्यांदा लाँच होणार आहे. कंपनीने सोमवारी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ‘Poco X2’ हा ४ फेब्रुवारी पर्यंत लाँच होणार असल्याचे सांगितले आहे. फ्लिपकार्टने लाँच केलेल्या टीजरच्या माध्यमातून ‘पोको’ लाँचिंग करीता पूर्णपणे तयार असल्याचे दिसते आहे. मात्र ‘Poco X2’ हा फोन ‘Redmi k30 4G’चा नवा व्हर्जन असल्याचे म्हंटले जात आहे.

- Advertisement -

 

पोको कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर देखील ‘Poco X2’ बद्दल अधिक माहिती देण्यात आली आहे. पोको इंडियाने एका ट्विटच्या माध्यमातून ‘Poco X2’ च्या लाँचिंगची तारीख जाहीर केली आहे. कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये मल्टी कॅमेरा, उत्कृष्ट दर्जाचे टच पॅड असे विविध फिचर असणार आहेत. सर्वसाधारणपणे अनेक मोबाईलमध्ये 60Hz रिफ्रेश रेट डीस्प्लेकरिता वापरण्यात येतो. मात्र जर हा स्मार्टफोन ‘Redmi k30 4G’ चा नवा व्हर्जन असल्यास यात 120Hz रिफ्रेश रेट वापरण्यात येईल.

- Advertisement -

फ्लिपकार्ट कंपनीने या फोनकरिता एक स्वतंत्र वेबसाईट लाँच केली आहे. त्यामुळे ‘Poco X2’ च्या ई-रीटेलर्सपैकी फ्लिपकार्ट एक असल्याचे यावरून स्पष्ट होते. शाओमी कंपनीपासून वेगळे झाल्यावर ‘Poco X2’ हा पोको कंपनीचा पहिलाच स्मार्टफोन आहे. यानंतर पोको कंपनी येणाऱ्या काळात ‘फ्लैगशिप Poco F2’ हा देखील एक नवा स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. मात्र पोको इंडियाने Poco F2 हा ‘Redmi k30 4G’चा नवा व्हर्जन असल्याची अधिकृत घोषणा अद्याप केली नाही आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -