३० हजार पबजी प्लेअर्सना केले हॅक, जाणून घ्या कारण

'PUB G' हा खेळ एकावेळी १०० प्लेअर्स एकत्र खेळत असतात. या खेळात पुढे जाण्यासाठी अनेकदा चीट कोड वापरले जातात.

Mumbai
pubg
लहानग्यांसह तरुणाई पब-जीच्या विळख्यात

मोबाईल, डेस्क टॉपवर सगळ्यात जास्त खेळला जाणारा खेळ म्हणजे ‘PUB G’. जर तुम्ही देखील तासनतास हा खेळ खेळत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण जर तुम्ही हा खेळ जिंकण्यासाठी अशी काही ट्रिक वापरत असाल तर तुम्हाला या खेळातून हाकलले जाऊ शकते. कारण तब्बल ३० हजार युजर्सना या खेळाच्या डेव्हलपर्सकडून ब्लॉक करण्यात आले आहे. या युजर्सना का हॅक करण्यात आले आहे. या मागील कारणही जाणून घ्या.

PUBG गेम खेळण्याची 5 कारणे

का केले ब्लॉक ?

‘PUB G’ हा खेळ एकावेळी १०० प्लेअर्स एकत्र खेळत असतात. या खेळात पुढे जाण्यासाठी अनेकदा चीट कोड वापरले जातात.या चीट कोडचा वापर करुन या खेळात बऱ्याच गोष्टी मिळवल्या जातात. हे लक्षात आल्यामुळे आतापर्यंत अशा ३० हजार युजर्सना या खेळातून ब्लॉक करण्यात आले आहे. या खेळामधून काही प्रोफेशन खेळाडूंनाही ब्लॉक करण्यात आल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे.

पबजी, फोर्ट नाईट, फिफा २०१८ खेळांचा मोठ्या पडद्यावर अनुभव | IGX 2018

काय फायदा होतो चीट कोडचा ?

चीट कोडचा उपयोग करणारे प्लेअर्स एकाच वेळी दोन मॉनिटर्सचा उपयोग करत असतात. हा खेळच शत्रूला मारण्याचा असल्यामुळे शत्रू कुठून येतो हे माहीत असणे आवश्यक असते. हॅकर्स या संदर्भातील चीट कोडचा वापर शत्रूची चाल ओळखू शकतात. अन्यथा एखादा  साधा प्लेअर शत्रुची चाल ओळखू शकत नाही आणि तो मरुन जातो. या चीट कोडला मॅजिकल लॅडर म्हणतात. आणि अनेक हॅकर्स ते हे खेळ खेळणाऱ्यांना हे चीड कोट काही हजारांना विकतात. जर तुम्ही हा खेळ खेळत असाल आणि जिंकण्यासाठी असे अशी मॅजिकल लॅडर वापरत असाल तर सावधान!

PUB G ने घेतला तिघांचा जीव

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here