घरटेक-वेकभारताने ताकीद दिल्यानंतर 'पबजी' गेमची माघार

भारताने ताकीद दिल्यानंतर ‘पबजी’ गेमची माघार

Subscribe

पबजी गेम मुळे होणाऱ्या दुष्परीणामांना आळा घालण्यासाठी आत्ता खुद्द पबजी कंपनीने पावले उचलणार असल्याचे अश्वासन दिले आहे.

भारतात पबजी गेम तरूणाईमध्ये  चांगलाच लोकप्रिय आहे. मात्र या खेळाचे अनेक दुष्परिणाम आतापर्यंत समोर आले आहेत. अनेक तरूणांमध्ये या खेळामुळे हिंसक भावना वाढीस लागत आहे. विद्यार्थांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच पबजी मोबाईल गेमवर भारतात बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र आता याची दखल खुद्द पबजी कंपनीने घेतली आहे. पबजी खेळा पासून कोणाचेही नुकसान होणार नाही. त्यासाठी खेळात सकारात्मक बदल करणार असल्याचे निवेदन कंपनीने सादर केले आहे.

लोकांच्या सूचनांचा विचार करणार 

पबजी खेळाला भारतात मिळालेली प्रसिद्धी आणि प्रतिसाद उत्तम आहे. त्यामुळे लोकांच्या भावनांचा, प्रतिक्रीयांचा आम्ही नक्की विचार करू. लोकांची मानसिकता आणि आरोग्यावर पबजी खेळामुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाही याकडे लक्ष देऊ. भारतात या खेळासाठी पोषक वातावरण आणि आवश्यक बदल नक्की करु. पबजी मोबाईल गेममुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे पालक, विद्यार्थी, सरकारी कर्मचारी यांच्या सूचनांचा नक्की विचार करून सुधारणा करण्यात येईल, असे आश्वासन पबजीने दिले आहे.

- Advertisement -

पबजीचे परिणाम

भारतातील एका सर्वेक्षणा नुसार पबजी हा मानसिक संतुलन बिघडवणारा गेम आहे. यामुळे माणसाच्या हिंसक वृत्तीत वाढ होते. पबजी गेम एक प्रकारचे व्यसन आहे. यामुळे विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आतापर्यंत पबजी मुळे अनेक आत्महत्या आणि वादविवादाच्या घटना समोर आल्या आहेत. परिक्षा पे चर्चाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यावर प्रतिक्रीया दिली होती.

भारतात पबजी खेळाने गेमींग क्षेत्रात मोठी उलाढाल झाली आहे. संपूर्ण गेमींग क्षेत्रात २०२३ पर्येत ११,८८० कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. तर केवळ भारतीय मोबाईल गेमींग मुळे २०२२ पर्यंत गेमिंग उद्योग ९.४३ दशलक्ष डॉलर पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -