घरटेक-वेकभारतात पबजीचे नवे अपडेट, तर प्राइन सेवा लाँच

भारतात पबजीचे नवे अपडेट, तर प्राइन सेवा लाँच

Subscribe

एकीकडे राज्यात पबजी गेम खेळणाऱ्यांवर कारवाई होत आहे. तर दुसरीकडे पबजी गेमने आपल्या चाहत्यांसाठी नवे अपडेट आणि सेवा आणल्या आहेत.

पबजी म्हणजेच प्लेयर अननोन बॅटल ग्राउंड्स हा मोबाईल गेमने तरूण पिढीला वेड लावले आहे. हा गेम अँड्रॉइड आणि आय. ओ. एस या ऑपरेटिंग सिस्टीमवर तर डेस्कटॉपवर सुद्धा उपलब्ध आहे. पबजी मोबाईल गेम चाहत्यासाठी मोठी बातमी आहे. नुकतेच पबजी गेमने भारतामध्ये ०.११.५ नवा अपडेट आणला आहे. तर त्यासोबत पबजी प्राइम आणि पबजी प्राइम प्लस सेवा लाँच केली आहे. तसेच या वर्षी जानेवारीमध्ये पबजी गेम खेळणाऱ्यांना प्राइम मेंबरशिप सबस्क्रिप्शन देणाच्या तयारीला सुरूवात केली आहे. तर या प्राइम सेवामध्ये पबजी खेळणाऱ्या खेळाडू अननोन कॉश कमवू शकतात. तर त्याच पैशामध्ये खेळाडू हत्यारा सुद्धा खरेदी करू शकतात. मात्र, एकीकडे राज्यात पबजी गेम खेळणाऱ्यांवर कारवाई होत आहे. तर दुसरीकडे पबजी गेमने आपल्या चाहत्यांसाठी अपडेट आणि नव्या सेवा आणल्या आहेत.

बंदी असूनही अपडेट लाँच

पबजी हा मोबाईल गेम तरूणाईमध्ये लोकप्रिय आहे. मनोरंजन आणि मनाच्या समाधानासाठी तरूण पिढी हा गेम खेळत आहे. मात्र, या गेमने आपल्या मनोरंजनाची सीमा पार करून त्याचा अतिरेक जीवावर बेदताना दिसत आहे. या गेममुळे तरूणांमध्ये हिंसक वातावरण वाढल्याचे दिसत आहे. तसेच दिवस भर पबजी गेम खेळामुळे विद्यार्थांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे. त्यामुळे या गेमवर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच गुजरातमधील राजकोट आणि सुरतमध्ये बंदी घालण्यात आली आहे. तसेच अनेक पालकांनीही पबजी गेममुळे मुलांवर वाईट परिणाम होत आहेत, अशा तक्रारीही दाखल झाल्या होत्या.

- Advertisement -

पबजी मुळे घटलेल्या घटना

अलिकडेच पबजी खेळण्यासाठी एका मुलाने ५० हजार चोरच्या घटना समोर आली होती तर, गुजरातमध्ये बंदी असूनही पबजी गेम खेळल्याने १० जणांना अटक करण्यात आले होते. पबजी गेम खेळू नको असे सांगितल्यामुळे आत्महत्या केल्याची घटनासुद्धा समोर आली आहे. अशा प्रकारच्या घटना समोर येत असुनही पजबी मोबाईल गेमचे नवे अपडेट लाँच करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -