घरटेक-वेकपबजी बॅन करा; लहान मुलाचे फडणवीसांना चार पानी पत्र

पबजी बॅन करा; लहान मुलाचे फडणवीसांना चार पानी पत्र

Subscribe

पबजीमळे दुष्परिणाम होतात, हे सांगायला आता ज्योतिषाची गरज नाही. एक ११ वर्षांचा मुलगा पुढे येत या गेमवर बंदी आणण्याची मागणी करत आहे.

आजकाल लहान असो किंवा मोठे सगळेच जण पबजी खेळताना दिसतात. पण या गेमवर बंदी आणली पाहिजे अशी मागणी ११ वर्षीय मुलाने पत्राद्वारे महाराष्ट्र सरकार जवळ केली. अहाद असं या मुलाचं नाव आहे. त्याने सरकारला चार पानांचं पत्र लिहलं आणि त्यात पबजी कसा घातक आहे, हे स्पष्ट केले. या पत्रात त्याने लिहिलं आहे की, पबजी असा गेम आहे ज्यामध्ये हिंसा, हत्या, मारधाड, लूटमार, व्यसन आणि सायबर गुंडगिरी एवढचं आहे. हा गेम फक्त अशाच गोष्टींना वाव देत आहे. अहाद पुढे म्हणतो, मी विनंती करतो की लवकरच हा गेम बंद करावा. जर योग्यवेळी गेमवर बंदी नाही आणली तर आपण कायदेशीर मार्गाने त्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही त्याने केले आहे.

सगळ्यांना पत्र पाठवले

रवीशंकर प्रसाद (केंद्रीय मंत्री), विनोद तावडे (शिक्षण मंत्री), आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित अजून चार जणांचा उल्लेख अहादने आपल्या पत्रात केला आहे. पण पत्रावर अहादला कोणतंही उत्तर मिळाले नाही. यामुळे त्याने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींच्या ‘परिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात देखील आपला मुलगा सतत पबजी खेळत असल्याची तक्रार काही पालकांनी केली होती. पबजीमुळे मुलं अभ्यास करत नसल्याची तक्रार पालकांनी केली. जम्मू-काश्मीरमध्ये राहणारा एक फिटनेस ट्रेनर सलग १० दिवस पबजी खेळत होता. यामुळे त्याच्या मानसिक स्थितीवर परिणाम देखील झाला. त्याला काही करून १० दिवस पबजी खेळण्याच मिशन पूर्ण करायचं होतं.

नेमक पबजी काय आहे 

पबजी कॉर्पोरेशन, ब्लुहोल  यांच्याद्वारे पबजी चालवला जातो. पबजी म्हणजे प्लेअर अननोन्स बॅटलग्राऊंड गेम, ज्यामध्ये १०० खेळाडू एका ठिकाणी येतात. १०० खेळाडू शस्त्रे वापरून एकमेंकाशी लढाई करत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात. खेळाचे सुरक्षित क्षेत्र (सेफ झोन) वेळोवेळी कमी होत जाते आणि जिवंत असलेल्या खेळांडूना एकमेकांशी लढण्यासाठी सुरक्षित क्षेत्रात जावे लागते. जर कोणताही खेळाडू सुरक्षित क्षेत्राच्या बाहेर राहिला तर त्याचा गेम मध्ये मृत्यु होतो. सर्वांवर मात करून शेवटी जो खेळाडू किंवा एखादा संघ जिवंत राहतो तो या खेळाचा विजेता ठरतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -