घरटेक-वेकव्हॉट्स Appवर चॅट ओपन न करता मेसेज वाचण्यासाठी खास ट्रिक

व्हॉट्स Appवर चॅट ओपन न करता मेसेज वाचण्यासाठी खास ट्रिक

Subscribe

व्हॉट्स Appवर आपण अनेक लोकांशी बोलतो. त्याचप्रमाणे अनेक ग्रुपमध्येही सामिल असतो. प्रत्येक ग्रुपमध्ये काय चालू आहे हे आपल्याला माहिती असणे गरजेचे वाटते. परंतु आपण ते चॅट वाचतो हे आपल्याला समोरच्याला कळून द्यायचे नसते. त्यासाठी ही ट्रिक अत्यंत महत्त्वाची आहे.

व्हॉट्स App आपल्या युझर्ससाठी नेहमीच नवीन आणि वेगळे फिचर्स घेऊन येत असते. व्हॉट्सAppच्या फिचर्समुळे युझर्सना चॅटिंगचा मजेदार अनुभव घेता येतो. व्हॉट्सApp हे व्हॉट्स App वेबसाठीही नवीन फिचर्स आणत असते. व्हॉट्स App वेबवर चॅटिंग ओपन न करताही मेसेज तुम्ही वाचू शकता. त्यामुळे तुम्हाला जर आलेला मॅसेज तुम्ही वाचला आहे हे समोरच्याला कळू नये असे वाटत असेल तर त्यासाठी हे फिटर खूप फायदेशीर आहे. पाहूयात व्हॉट्स Appवेबवर चॅट ओपन न करता मेसेज कसे वाचायचे.

व्हॉट्स Appवेबवर चॅट ओपन न करता मेसेज कसे वाचायचे

  • पहिल्यांदा तुमच्या मोबाईलने व्हॉट्स Appवेब कनेक्ट करा.
  • व्हॉट्स App वेब ओपन करण्यासाठी व्हॉट्स App ओपन केल्यानंतर उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. तुम्हाला व्हॉट्स App वेब हा पर्याय दिसेल.
  • डेक्सटॉपवर व्हॉट्स App वेब ओपन करून तिथे आलेला OR CODE तुमच्या मोबाईलवरून स्कॅन करा. त्यानंतर तुमचे व्हॉट्स App डेक्सटॉपवर ओपन होईल.
  • व्हॉट्स App वेब ओपन केल्यानंतर तुमच्याकडे आलेल्या मेसेज वर कर्सर नेऊन ठेवा. आलेल्या मेसेज छोट्या बॉक्समध्ये ओपन होईल त्यातून तुम्ही आलेला मेसेज काय हे चॅट ओपन न करता पाहू शकता.

व्हॉट्स Appवर आपण अनेक लोकांशी बोलतो. त्याचप्रमाणे अनेक ग्रुपमध्येही सामिल असतो. प्रत्येक ग्रुपमध्ये काय चालू आहे हे आपल्याला माहिती असणे गरजेचे वाटते. परंतु आपण ते चॅट वाचतो हे आपल्याला समोरच्याला कळून द्यायचे नसते. त्यासाठी ही ट्रिक अत्यंत महत्त्वाची आहे. याशिवाय व्हॉट्सapp वर ऑटोडिलाईट, व्हॉट्स App पेमेंट, वॉलपेपर असे बरेच नवीन फिचर्स आले आहेत. या सगळ्यामुळे व्हॉट्स App वापरणे युझर्ससाठी खूप सोपे आणि मजेशीर झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नव्या वर्षात What’s App आणणार ३ नवे फिचर्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -