घरटेक-वेक'या' दिवशी Realme 3 Pro च्या स्मार्टफोनचा पहिला सेल

‘या’ दिवशी Realme 3 Pro च्या स्मार्टफोनचा पहिला सेल

Subscribe

Realme 3 Pro चे स्मार्टफोन भारतामध्ये तीन व्हरायटीमध्ये लाँच करण्यात आले आहेत. तर हे स्मार्टफोन्स भारतातील ग्राहकांना लवकरच खरेदी करता येणार आहेत.

Realme 3 Pro स्मार्टफोनला भारतामध्ये या आठवड्याच्या सुरूवातीला लाँच केले होते. Realme 3 Pro हा स्मार्टफोन जेव्हा लाँच केला, तेव्हा फक्त ४ जीबी रॅम तर ६४ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम तर १२८ जीबी स्टोरेज असा व्हरायटीमध्ये लाँच केले होते. मात्र, आता अजून एका व्हरायटीमध्ये म्हणजेच ६ जीबी रॅम तर ६४ जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन लाँच केला आहे. तसेच कंपनीने याची किंमत १५,९९९ रूपये अल्याचे सांगितले आहे. तर या स्मार्टफोनचा पहिला सेल २९ एप्रिलला ठेवण्यात आला आहे. तर अशा तिन प्रकारच्या व्हरायटीमध्ये ग्राहकांना हा स्मार्टफोन रियलमी ऑनलाइन स्टोरवर उपलब्ध होणार आहे. रियलमी इंडियानी या स्मार्टफोनच्या लाँच आणि सेलची घोषणा त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून केली आहे.

- Advertisement -

या किंमतीमध्ये मिळतील हे स्मार्टफोन्स

दरम्यान Realme 3 Pro च्या ४ जीबी रॅम तर ६४ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम तर १२८ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत १३,९९९ रूपये आणि १६,९९९ रूपये अशी किंमतीमध्ये लाँच केले आहेत. तसेच ग्राहक हे स्मार्टफोन कार्बन ग्रे, नायट्रो ब्लू आणि लाइटनिंग पर्पल कलर ऑप्शनमध्ये खरेदी करु शकतात. Realme 3 Pro च्या तिन्ही व्हरायटीचे स्मार्टफोन ग्राहक २९ एप्रिलला दुपारी वाजल्यापासून खरेदी करू शकतात. मात्र, लाइटनिंग पर्पल कलरचा ऑप्शन या सेलमध्ये उपलब्ध होणार नाही आहे.

काय विशेष आहे या स्मार्टफोन्समध्ये

Realme 3 Pro स्मार्टफोन डुअल सिम आणि नॅनो सिम कार्डला सपोर्ट करणार आहे. तसेच ६.३ इंच एचएफटी+ आयपीएस डिस्प्ले दिला आहे. तसेच ४ जीबी आणि ६ जीबी ऑप्शन मिळणार आहेत. तर १०एनएम प्रोसेर्ससोबत २.२ गीगाहर्ट्झ स्पीड ऑक्टा-कोरच्या गतीवर आधारित क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७१० एआयई प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच कॉमेऱ्याबद्दल बोलायचे झाले, तर या स्मार्टफोनना १६ एमपी आणि ५ एमपी असे दोन रिअल कॉमेरे दिले आहेत. तर दुसरीकडे, अल्ट्रा एचडी एक्सपर्ट मोड देखील देण्यात आला आहे, जेणेकरून यूजर्सना ६४ एमपीमध्ये फोटो क्लिक करू शकतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -