रिअलमीने जबरदस्त ‘हे’ इअरफोन भारतात केले लाँच

realme buds air pro and realme buds wireless pro earphones launched in india
रिअलमीने जबरदस्त 'हे' इअरफोन भारतात केले लाँच

भारतात आज रिअलमीने आपला व्हर्च्युअली एक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये कंपनीने सर्वात प्रतीक्षेत असलेला स्मार्टफोन Realme 7i आणि जगातील पहिला ५५ इंचाचा SLED स्मार्ट टीव्ही लाँच केला. या टीव्हीसाठी युजर्स खूप प्रतिक्षा करत होते. एवढेच नाही तर कार्यक्रमामध्ये इतर वस्तू देखील पाहायला मिळाले. ज्यामध्ये Realme Buds Air Pro आणि Buds Wireless Pro समावेश होता. या दोन्ही इअरफोनमध्ये शानदार साउंड क्वालिटी आणि दमदार फीचर्स आहेत. जाणून घ्या या जबरदस्त इअरफोनची किंमत.

भारतात Realme Buds Air Pro ४ हजार ४९९ रुपयांच्या किंमतीत लाँच केला गेला आहे. तर Buds Wireless Pro ३ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध केला आहे. हे दोन्ही इअरफोन ऑफिशियल वेबसाईटवर आणि ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart वर १६ ऑक्टोबरपासून उपलब्ध असेल.

खास गोष्ट अशी आहे की, फेस्टिव्हल सेलमध्ये हे डिव्हाइस कमी किंमतीत खरेदी करू शकला. युजर्सना Realme Buds Air Pro वर ५०० रुपये डिस्काउंट मिळेलं. त्यामुळे तुम्ही ४ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकालं. तर Buds Wireless Pro वर १ हजार रुपये डिस्काउंट मिळेलं. त्यामुळे तुम्ही ३ हजार ९९९ रुपयांमध्ये नाही तर २ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकालं.


हेही वाचा – भारतात ‘या’ दिवशी लाँच होणार Xiaomi फ्लॅगशिप Mi 10T सीरीज