Realme X2 Pro स्मार्टफोन फक्त १००० रूपयात करता येणार बुक

भारतीय मार्केटमध्ये Realme X2 Pro हा स्मार्टफोन २० नोव्हेंबर रोजी लाँच होणार

mumbai

भारतीय मार्केटमध्ये Realme X2 Pro हा स्मार्टफोन २० नोव्हेंबर रोजी लाँच होणार असून हा फोन चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. या फोनसह Realme 5s देखील लाँच करण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन लाँच होण्यापुर्वी ग्राहकांना Blind Sale वर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सेलमध्ये Realme X2 Pro हा स्मार्टफोन ग्राहकांना फक्त हजार रूपयांत बुक करता येणार आहे.

ग्राहकांना असा बुक करता येणार फोन

या स्मार्टफोनचा Blind Sale कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर आयोजित करण्यात येणार आहे. या सेलच्या माध्यमातून Realme X2 Pro हा स्मार्टफोन ग्राहकांना फक्त १००० रुपय़ात बुक करता येणार आहे. हा फोन बुक केल्यानंतर ग्राहकांना त्याच्या फोनची उरलेली किंमत २० नोव्हेंबर पर्यंत देता येणार आहे. याकाळातच कंपनी हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. या सेलदरम्यान पहिल्या ८५५ ग्राहकांना हा फोन बुक करण्याचा फायदा मिळणार आहे.

Realme X2 Pro चे असे आहे फीचर्स

  • ६.५ इंच असणारा फुल एचडी प्लस सुपर एमोलेड फ्लूड डिस्प्ले
  • १०८०x२४०० पिक्सल रेजोल्यूशन असलेला डिस्प्ले
  • कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्शन
  • सुरक्षिततेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर
  • क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ प्लस प्रोसेसर
  • ५०W SuperVOOC फ्लॅश चार्जला सपोर्ट करणारी ४००० एमएएच बॅटरी

तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध

  • ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज
  • ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज
  • १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज

ट्रिपल कॅमऱ्यासह Infinix S5 Lite भारतात लाँच; जाणून घ्या फीचर्स