घरटेक-वेकभारतात १५ सप्टेंबरला लाँच होणार Redmi 9i

भारतात १५ सप्टेंबरला लाँच होणार Redmi 9i

Subscribe

स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने (Xiaomi) Redmi 9i लाँच करण्याची घोषणा केली आहे. Redmi 9i स्मार्टफोन 15 सप्टेंबर रोजी भारतात लाँच करण्यात येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये यूजर्सला वॉटर-ड्रॉप नॉच डिस्प्ले, 4GB रॅम आणि मिड-रेंज प्रोसेसर मिळेल. कंपनीने यापूर्वी Redmi 9 a, Redmi 9 आणि Redmi 9 Prime स्मार्टफोन भारतीय बाजारात बाजारात आणले होता.

- Advertisement -

Redmi 9i स्मार्टफोनचा लाँचिंग इव्हेंट १५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार असून कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर थेट पाहता येईल. त्याचबरोबर हा स्मार्टफोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

Redmi 9i ची संभाव्य फीचर्स

समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, Redmi 9i स्मार्टफोन 4GB रॅम + 64GB स्टोरेज आणि 4GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये फोन लाँच केला जाईल. तसंच हा स्मार्टफोन नेचर ग्रीन, सी-ब्लू आणि मिडनाईट ब्लॅक कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. फीचर्सबद्दल बोलताना HD डिस्प्ले आणि मिड-रेंज चिपसेट या स्मार्टफोनमध्ये दिली जाऊ शकते. या फोनची बॅटरी आणि कॅमेर्‍याबद्दल माहिती मिळालेली नाही.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -