गुड न्यूज! ‘या’ दोन स्मार्टफोनचे दुसऱ्यांदा फ्लॅशसेल

New Delhi

सध्या शाओमीन ही कंपनी स्वस्त स्मार्टफोन विकण्यासाठी प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वी शाओमीनेचे सब ब्रँड कंपनी असलेल्या रेडमी के २० आणि रेडमी के २० प्रो हे दोन स्मार्टफोन भारतातील बाजारात आणले होते. या कंपनीने हे आणलेल्या नवीन स्मार्टफोनचे पहिल्यांदा फ्लॅश सेल आयोजित केले होते. या पहिल्यांच फ्लॅश सेलमध्ये काही मिनीटांमध्ये हे दोन्ही मोबाइल फोन आउट ऑफ स्टॉक झाले. त्यामुळे आता पुन्हा या दोन्ही स्मार्टफोनचे शाओमीने दुसऱ्यांदा फ्लॅश सेलचं आयोजन केलं आहे. या सेलची सुरूवात ही दुपारी १२ वाजेल्यापासून फ्लिपकार्ट आणि mi.com या संकेतस्थळावर होणार आहे.

के २० आणि के २० प्रो या दोन्ही स्मार्टफोनच्या खरेदीवर डबल डेटा मिळेल. त्यामुळे युझर्सला जर डबल डेटा पाहिजे असेल तर २४९ किंवा २९९ रुपयांचा रिचार्ज करावा लागले. भारतात या शाओमीनच्या के २० स्मार्टफोनची किंमत ही २१ हजार ९९९ रुपये आहे तर के २० प्रो या स्मार्टफोनची किंमत २७ हजार ९९९ रुपये आहे. तसेच एअरटेल कंपनीच्या ग्राहकांना एअरटेल थँक्स गोल्डचे देखील फायदे मिळणार आहेत.

रेडमी के २० बद्दल माहिती

 

इंटरनल स्टोरेज १२८जीबी
रॅम ६जीबी
अँड्रॉइड ९ पाय (MIUI 10)
६.३९ इंच AMOLED डिस्प्ले
स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३० एसओसी प्रोसेसर
फोटोग्राफीसाठी मागील कॅमेराला ट्रिपल कॅमेरा सेटअप
या कॅमेरामध्ये पहिल्या कॅमेरात ४८ मेगापिक्सल, दुसऱ्या कॅमेरात १३ मेगापिक्सल तर तिसरा कॅमेरात ८ मेगापिक्सल देण्यात आला असून सेल्फी आणि व्हिडिओसाठी २० मेगापिक्सल विथ पॉप अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच बॅटरीची क्षमता ही 4000mAh आहे.

रेडमी के २० प्रो बद्दल माहिती

इंटरनल स्टोरेज २५६जीबी
रॅम ८जीबी
MIUI 10 ऑपरेटिंग सिस्टिम
६.३८ इंच फुल एचडी+AMOLED डिस्प्ले
स्नॅपड्रॅगन ८५५ एसओसी प्रोसेसर
फोटोग्राफीसाठी मागील कॅमेराला ट्रिपल कॅमेरा सेटअप. या कॅमेरामध्ये पहिला Sony IMX586 सेंसरसह ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, दुसऱ्या कॅमेरात १३ मेगापिक्सल असून तिसऱ्यामध्ये ८ मेगापिक्सल देण्यात आला असून सेल्फी आणि व्हिडिओसाठी २० मेगापिक्सल विथ पॉप अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच बॅटरी क्षमता ही 4000mAh आहे.