घरटेक-वेककसा आहे Redmi Note 6 Pro? वाचा रिव्ह्यु!

कसा आहे Redmi Note 6 Pro? वाचा रिव्ह्यु!

Subscribe

Xiaomi चा नवा फोन Redmi Note 6 Pro झाला रिलीज. २३ नोव्हेंबर पासून त्याचा फ्लॅश सेल सुरू होणार आहे.

Xiaomi ने २०१६ मध्ये आपल्या Redmi Note फोनची सिरीज सुरू केली. त्यात आता नवं मॉडेल म्हणजेच Redmi Note 6 Pro मार्केटमध्ये आला आहे. २२ नोव्हेंबर रोजी हा फोन लाँच झाला. याची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. या फोनची काय खासियत आहे हे आपण आता पाहुयात. आणि हा फोन त्याच्या आधीचं मॉडेल म्हणजेच Redmi Note 5 Pro पेक्षा किती वेगळा आहे हे पाहुया!

Redmi Note 6 Pro हा दोन व्हेरियन्टमध्ये आहे. पहिला आहे 4 GB RAM आणि 64 GB स्टोरेज. याची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. दुसरं मॉडेल आहे 6 GB RAM आणि 64 GB स्टोरेज. याची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. दोन्ही फोन २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून फ्लॅश सेलवर मिळणार आहे. पहिल्या सेलवेळी 4 GBचा फोन १२ हजार ९९९ ला मिळणार आहे तर 6 GBचा फोन १४ हजार ९९९ ला उपलब्ध असणार आहे.

- Advertisement -

काय आहे Redmi Note 6 Pro मध्ये?

  • Redmi Note 6 Pro मध्ये एकूण ४ कॅमेरे : २ रेअर आणि २ फ्रंट
  • Redmi Note 6 Proला नॉच डिसप्ले
  • Dual VoLTE म्हणजे 4G सिम
  • अॅन्ड्रॉइड 8.1 Oreo ऑपरेटिंग सिस्टिम
  • Qualcomm Snapdragon 636 प्रोसेसर आणि 4000mAh बॅटरी
  • Redmi Note 5 Pro पेक्षा Redmi Note 6 Pro ची स्क्रीन साइज मोठी आहे. 6.2-inch FullHD+ डिसप्ले

डिस्प्ले

Redmi Note 6 Pro आणि Redmi Note 5 Pro मध्ये जास्त फरक नाही. फोनचं मूळ डिजाइन सारखंच आहे. मागे दोन कॅमेरे आणि त्याच्या बाजूला फिंगर प्रिंट स्कॅनर. या फोनमध्येही फेस अनलॉक आहे. या फोनची स्क्रीन मोठी आणि चांगली आहे. 6.2-inch FullHD+ डिसप्ले आहे. 2280 x 1080 pixels चे रेजल्युशन आहे. 1500:1 कॉन्ट्रास्ट रेशियो आहे आणि 500-nit ब्राइटनेस आहे.

कॅमेरा

Redmi Note 6 Pro चा कॅमेरा Xiaomi चा आजवरचा सर्वात बेस्ट कॅमेरा आहे. आणि एवढ्या कमी पैशात इतका छान कॅमेरा आहे. यामुळे आता बाकी फोन कंपन्यांमध्ये खरंच स्पर्धा आहे. Redmi Note 6 Pro मध्ये 12MP + 5MP ड्युअल कॅमेरा आहे. F1.9 lens असल्यामुळे यामध्ये कमी प्रकाशात देखील फोटोग्राफी चांगली येते. ही लेन्स Redmi Note 5 Pro च्या F2.2 lens पेक्षा जास्त वाइड आणि शार्प आहे. पुढे 20MP मेन कॅमेरा आहे आणि 2-megapixel सेकन्डरी सेन्सर आहे. यात उत्तमरित्या बोके आणि पोर्ट्रेट मोड मध्ये फोटो काढता येतात.

- Advertisement -

बॅटरी

Redmi Note 6 Pro ला 4000mAh बॅटरी आहे. ही बॅटरी खूप काळ टिकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -