रेडमी नोट ७, रेडमी नोट ७ प्रोची होणार ओपन सेलमध्ये विक्री

रेडमी नोट ७ आणि रेडमी नोट ७ प्रो हे स्मार्टफोन आज १२ वाजल्यापासून ओपन सेलसाठी ई- कॉमर्सच्या साइटवर उपलब्ध झाले आहेत.

Mumbai
redmi note 7 pro redmi note 7 sale set for today
रेडमी नोट ७, रेडमी नोट ७ प्रोची होणार ओपन सेलमध्ये विक्री

शाओमी या चीन कंपीनीने फेब्रुवारीमध्ये रेडमी नोट ७ आणि रेडमी नोट ७ प्रो हे स्मार्टफोन लाँच केला होते. रेडमी नोट ७ हा स्मार्टफोन आतापर्यंत फ्लॅश सेलमध्ये उपलब्ध होते. मात्र, आज १२ वाजल्यापासून हा स्मार्टफोन ओपन सेलमध्ये उपलब्ध झाला आहे. आता ग्राहकांना फ्लॅश सेलची वाट बघत बसावे लागणार नाही आहे. तसेच ई- कॉमर्सच्या वेबसाईटवर उपलब्ध झाला आहे. ‘फ्लिपकार्ट’, कंपनीची अधिकृत वेबसाइट ‘एमआय.कॉम’ आणि ‘एमआय होम स्टोर्स’ वरून ग्राहक खरेदी करू शकतात. तसेच रेडमी नोट ७ सोबत रेडमी नोट ७ प्रो हा स्मार्टफोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे.

या पर्यायात उपलब्ध

रेडमी नोट ७ आणि रेडमी नोट ७ प्रो या स्मार्टफोनची विक्री आज पासून सुरू झाली आहे. ग्राहकांना नोट ७ हा स्मार्टफोन ऑनिक्स ब्लॅक, रुबी रेड आणि सफायर ब्लूमध्ये तर नोट ७ प्रो हा स्मार्टफोन नेप्चून ब्लू, नेबुला रेड आणि स्पेस ब्लॅक अशा कलरमध्ये उपलब्ध आहे.

रेडमी नोट ७

  • स्मार्टफोनचा डिस्प्ले ६.३ इंच आहे
  • वॉटरड्रॉप नॉच डिझाइनसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर आहे.
  • ४८ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचे दोन कॉमेरे आहेत, तसेच सेल्फीसाठी १३ मेगापिक्सल कॅमेरा आहे.
  • ४००० एमएएच बॅटरी आहे, तसेच सी-युएसबी चार्जिंगचा पर्याय आहे.
  • हा स्मार्टफोन ३ जीबी, ४ जीबी आणि ६ जीबी रॅमच्या पर्यायामध्ये तर ३२ जीबी आणि ६४ जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे.

रेडमी नोट ७ प्रो

  • ११ एनएम प्रोसेसवर बनवलेला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६७५ प्रोसेसर दिला आहे.
  • ४८ मेगापिक्सल चा प्राईम कॉमेरा दिला आहे.
  • ड्यूरेबिलिटीसाठी स्मार्टफोनच्या समोर आणि मागे दोन्ही पॅनेलवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ चे संरक्षण दिले गेले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here