Redmi Note 7: पहिल्या फ्लॅशला तुफान प्रतिसादानंतर ‘यादिवशी’ दुसरा सेल

रेडमी नोट ७ च्या पहिल्या सेलला लोकांनी चांगलीच पसंती दर्शवली असून आता गुरुवार १३ मार्चला दुसरा सेल अलल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

Mumbai
Redmi note 7
रेडमी नोट ७

रेडमी नोट ७ चा पहिला सेल बुधवारी ६ मार्चला झाला होता. या पहिल्याच सेलमध्ये अवघ्या पाच मिनिटांमध्येच भारतात रेडमी नोट ७ चे २ लाख फोन विकले गेल्याची माहिती शाओमीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक मनु जैन यांनी दिली आहे. पहिल्या सेलला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कंपनीने १३ मार्चला दुसरा सेल ठेवला असून जास्तीत जास्त फोनची निर्मिती करण्याचे कंपनीने आश्वासन दिले आहे. तसेच १३ मार्चला असलेल्या या दुसऱ्या सेलमध्ये ग्राहकांसाठी रेडमी नोट ७ बरोबरच रेडमी नोट ७ प्रो चा पहिला सेल लॉंच करण्यात येणार आहे.

या ठिकाणी घेता येणार फोन

६ मार्चच्या पहिल्या सेल प्रमाणेच १३ मार्चचा सेल देखील Me.com, Home store आणि फ्लिपकार्ट या तीन वेबसाईटसवर ठेवण्यात आला आहे. दुपारी १२ वाजल्या पासून या सेलला सुरवात होणार आहे. रेडमी नोट ७ सोबतच रेडमी नोट ७ प्रो देखील सेलमध्ये ठेवण्यात येणार असल्याने एकाच कंपनीचे हे दोन फोन एकमेकांशी स्पर्धा करणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही फोन या सेलचे आकर्षण ठरणार आहेत.

काय आहेत ऑफर्स

रेडमी नोट ७ ची भारतीय किंमत ९,९९९ रुपये इतकी आहे. त्यामध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज असणार आहे. तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज साठी ११,९९९ इतकी किंमत असणार आहे.

रेडमी नोट ७ खरेदी करणाऱ्यांना तीन रंगांचे पर्याय उपलब्ध असणार आहेत. त्यामध्ये ब्लॅक, ब्लू, रुबी रेड असे तीन पर्याय असणार आहेत. मोबाईल खरेदी सोबतच कंपनी कडून ग्राहकांना बॅक कवर मोफत मिळणार आहे.

तर मोबाईल सोबत एअरटेल कंपनीचे सीमकार्ड घेणाऱ्यांना १,१२० जीबी इतका मोबाईल डेटा आणि अनलिमिटेड फोन कॉलची ऑफर दिली जाणार आहे. रिलायंस जिओ कडून देखील ग्राहकांना डबल मोबाईल डेटा देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

रेडमी नोट ७ चा डिस्प्ले पूर्णपणे एचडी असणार आहे. फोनचा डिस्प्ले ६.३ इंचाचा असणार आहे. सूरक्षिततेच्या दृष्टीकोनातून फोनच्या डिस्प्लेवर गोरीला ग्लास ५ बसवण्यात आली आहे.

या मोबाईलमध्ये ६६० ऑक्टाकोर प्रोसेसर असणार आहे. ३२ आणि ६४ जीबी स्टोरेज सोबतच मेमरीकार्डच्या सहाय्याने २५६ जीबा पर्यंतच्या स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here