घरटेक-वेकRedmi Note 9 Pro ची आजपासून विक्री, १००० रुपयांपर्यंत मिळणार सूट

Redmi Note 9 Pro ची आजपासून विक्री, १००० रुपयांपर्यंत मिळणार सूट

Subscribe

Redmi Note 9 Pro या स्मार्टफोनच्या विक्रीला आजपासून सुरुवात झाली आहे. आयसीआयसीआय क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरल्यास ग्राहकांना १००० रुपयांची सवलत मिळणार आहे.

Redmi Note 9 Pro या स्मार्टफोनची आज पुन्हा एकदा भारतात विक्रिला सुरुवात जाली आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून विक्रीला सुरूवात झाली. ग्राहक अ‍ॅमेझॉन आणि शाओमी इंडियाच्या वेबसाइटवरुन हा फोन खरेदी करू शकतील. गेल्या आठवड्यात फोनची विक्रीही झाली होती. या फोनची ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये डिलिव्हरी करण्यात येणार आहे. निळा, ग्लेशियर व्हाइट आणि इंटरस्टेलर ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये हा फोन मार्चमध्ये भारतात लाँच करण्यात आला होता. Redmi Note 9 Proच्या विक्रीची माहिती रेडमी इंडियाच्या ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे.

Redmi Note 9 Pro दोन व्हेरिएंट्समध्ये भारतात उपलब्ध आहे. 4GB + 64GB आणि 6GB + 128GB या दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. त्यांची किंमत अनुक्रमे १३,९९९ आणि १६,९९९ रुपये आहे. अ‍ॅमेझॉन आणि शाओमीच्या वेबसाइटवर ऑफरचा लाभही ग्राहकांना मिळणार आहे. आयसीआयसीआय क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरल्यास ग्राहकांना १००० रुपयांची सवलत मिळणार आहे. आयसीआयसीआय क्रेडिट कार्डच्या माध्यमातून दोन्ही वेबसाइटवर ईएमआय पर्यायदेखील उपलब्ध असेल.

- Advertisement -

Redmi Note 9 Pro के स्पेसिफिकेशन्स

या फोनमध्ये ६,६७ इंचाचा फुल एचडी प्लस (१,०८०x२,४०० पिक्सेल) आयपीएस डिस्प्ले आहे. हे LPDDR4X 6GB रॅम, Adreno 618 GPU आणि ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड बेस्ड MIUI 11 वर चालतो.


हेही वाचा – Huawei Y9s ट्रिपल रियर कॅमेरासह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

- Advertisement -

फोटोग्राफीसाठी क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 48MPचा आहे. याशिवाय 8MPचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, 5MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. इंटर्नल मेमरी 128GB आहे. यात 18W फास्ट चार्जिंगसह 5,020mAh बॅटरी आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -