घरटेक-वेककलर टच डिस्प्लेसह Redmi Smart Band भारतात लाँच; जाणून घ्या, किंमत

कलर टच डिस्प्लेसह Redmi Smart Band भारतात लाँच; जाणून घ्या, किंमत

Subscribe

जाणून घ्या, Redmi Smart Band चे स्पेसिफिकेशन्स

Redmi Smart Band भारतात लाँच झाला आहे. हा शाओमीच्या सब-ब्रँड रेडमीची ही पहिली वेअरेबल आहे. या फिटनेस बँडमध्ये कलर टच डिस्प्ले देण्यात आला असून चार्जिंगसाठी इंटीग्रेटेड USB प्लग देण्यात आला आहे. हा बँड एप्रिलमध्ये चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. Redmi Smart Band ची किंमत भारतात 1,599 रुपये आहे. 9 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजल्यापासून ग्राहक अॅमेझॉन, शाओमीची वेबसाइट, एमआय होम स्टोअर्स आणि ऑफलाइन किरकोळ विक्रेतांकडून खरेदी करू शकतील. तर ग्राहक हा ब्लॅक, निळा, ग्रीन आणि ऑरेंज रिस्टबँड कलर पर्यायांमध्ये विकत घेऊ शकतील.

Redmi Smart Band चे स्पेसिफिकेशन्स

  • यामध्ये 1.08 इंचाचा कलर OLED डिस्प्ले असून यात रेडमी बँड 24X7 हार्ट रेट मॉनिटरिंग देण्यात आला आहे. यात प्रोफेशनल स्पोर्ट्स मोड्स देण्यात आले आहेत आणि त्यामध्ये स्लीप क्वालिटी एनालिसिसचे फीचर्स देखील आहे. तसेच यात कॅलरी आणि स्टेप ट्रॅकर आणि आइडल अ‍ॅलर्टचे वैशिष्ट्य उपलब्ध आहे.
  • हा बँड 5ATM वॉटर रेझिस्टंटसाठी सर्टिफाइड आहे. तसेच शॉवर घेताना किंवा पोहण्याच्या वेळीही हा बँड घातला जाऊ शकते. हा वियरेबल कनेक्टेड Android किंवा iOS डिव्हाइसवरील सूचना देखील दर्शवितो.
  • रेडमी स्मार्ट बॅंड रेज-टू-वेक जेस्चरला सपोर्ट करतो. कंपनीच्या दाव्यानुसार, हा बँड सिंगल चार्ज नंतर 14 दिवस चालतो. या वियरेबलमध्ये USB प्लग देखील देण्यात आला आहे.
  • या बँडला चार्ज करण्यासाठी कस्टम चार्जरची आवश्यकता भासत नाही. यामध्ये ५० हून अधिक पर्सनैलाइज्ड वॉच फेसेस देखील देण्यात आले आहेत.

आता भारतात PUBG खेळता येणार? कोरियन कंपनीने चीनच्या ‘टेन्सेंट’कडून घेतला ताबा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -