Redmi Smart TV A65 लाँच; ड्यूल स्पीकरसह ‘हे’ आहेत खास फीचर्स

जाणून घ्या भन्नाट फीचर्स

Redmi ने गेल्या महिन्यात संकेत दिले होते कंपनी लवकरच एक नवीन स्मार्ट टीव्ही ए सीरीज लाँच करणार आहे. त्यानंतर कंपनीने Smart TV A55, A50 आणि A32मॉडेल्स सादर केले आहेत. आता कंपनीनेRedmi Smart TV A65ला लाँच केले आहे. कंपनीने जाहीर केलेल्या टीझरमध्ये स्मार्ट टीव्ही ए-सीरीजमधील सर्वात मोठा टीव्ही 65 इंचाच्या स्क्रीनसह येणार असल्याचे समोर आले आहे.

रेडमी स्मार्ट टीव्ही ए 65 मध्ये 65 इंची स्क्रीन आहे जी 4K रेजोल्यूशनपेक्षा कमी आहे. स्क्रीन HDR ला सपोर्ट देत असून त्यात हाय-पावर ड्यूल स्पीकर्सही आहेत. स्मार्ट टीव्हीवर शाओमीने विकसित केलेला एक ऑडिओ अल्गोरिदम आहे आणि DTS डिकोडिंगला सपोर्ट देखील करतो.

असे आहेत फीचर्स

रेडमी स्मार्ट टीव्ही ए 65 मध्ये एक अल्ट्रा-अरुंद बेझल आणि पियानो पेंट टेक्स्चर आहे. या टीव्हीमध्ये 4-कोर ए 53 प्रोसेसर, 1.5 जीबी रॅम आणि 8 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. इंटरफेसबद्दल सांगायचे झाले तर, स्मार्ट टीव्ही HDMI, USB, नेटवर्क केबल इंटरफेस, एन्टीना इंटरफेस, एव्ही आउटपुट इंटरफेस आणि S/PDIF सह येतो.

रेडमी स्मार्ट टीव्हीची ही आहे किंमत

रेडमी स्मार्ट टीव्ही ए 65 ची किंमत 2,599 चिनी युआन (सुमारे 28,300 रुपये) आहे. हा टीव्ही चीनमधील Jingdong वर खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहे.


दर ५ मिनिटाला विक्री होतेय या कारची; सलग सहा महिने पहिल्या क्रमांकावर