घरटेक-वेकडिसेंबरमध्ये Reliance Jio लाँच करणार स्वस्त Android फोन

डिसेंबरमध्ये Reliance Jio लाँच करणार स्वस्त Android फोन

Subscribe

कंपनी जिओचा हा कमी किमतीचा हँडसेट डेटा पॅकसह देणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ भारतात कमी किमतीचे फोन बाजारात आणण्याची तयारी करत आहे. अहवालानुसार रिलायन्स जिओ अँड्रॉइड आधारित हँडसेट डिसेंबरपर्यंत बाजारात आणणार असल्याचे सांगितले जात आहे. बिझिनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार कंपनी जिओचा हा कमी किमतीचा हँडसेट डेटा पॅकसह देणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडकडून अलीकडेच हे संकेत देण्यात आले होते की कंपनी कमी किमतीचे अँड्रॉइड बेस्ड फोन लाँच करणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकतीच गुगलबरोबर भागीदारीही केली असून जुलैमध्ये कंपनीने म्हटले आहे की गूगलचे पेरेंट अल्फाबेट रिलायन्सच्या डिजिटल युनिटमध्ये ४.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. आरआयएलचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जुलैमध्ये सांगितले होते की Google कमी किंमतीच्या 4G/5G स्मार्टफोनसाठी अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम तयार करणार आहे तर रिलायन्स त्याचे डिझाइन करणार आहे.

- Advertisement -

अहवालानुसार रिलायन्स जिओ गूगल प्लॅटफॉर्मवर चालणार्‍या १ कोटी कमी किमतीच्या स्मार्टफोनचे आउटसोर्स करू शकते. हा अहवाल बिझिनेस स्टँडर्डचा असून या अहवालानुसार गूगलच्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर चालणारे कमी किमतीचे स्मार्टफोन एकतर डिसेंबरमध्ये लाँच केले जातील किंवा कंपनी २०२१ च्या सुरुवातीला लाँच करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. चिनी कंपन्यांकडे सध्या स्मार्टफोन बाजारपेठ आहे. त्यापैकी प्रामुख्याने शाओमी, व्हिवो, ओप्पो, वन प्लस आणि रियलमी या कंपन्या आहेत. जिओच्या या हालचालीमुळे या कंपन्यांना भारतीय बाजारात चांगलीच टक्कर मिळणार आहे.


भारतात १५ सप्टेंबरला लाँच होणार Redmi 9i
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -