घरटेक-वेकजगातला सर्वात लहान कॉम्प्युटर! तांदळाएवढा आकार

जगातला सर्वात लहान कॉम्प्युटर! तांदळाएवढा आकार

Subscribe

आयबीएम या जगविख्यात कंपनीने जगातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केला आहे. धान्याच्या दाण्याइतका हा कॉम्प्युटर लहान आहे.

आजच्या काळात आपलं दैनंदिन आयुष्य हे बऱ्याच प्रमाणात गॅजेट्सनी व्यापलेलं आहे. सकाळी उठल्यापासून – रात्री झोपेपर्यंत आपण पाहिलं तर मोबाईल, कॉम्प्युटर, घड्याळ, प्रिंटर, लॅपटॉप, इयरफोन वेगवेळ्या गॅजेट्सनी आपण वेढलेले असतो. दिवसेंदिवस जशी गॅजेट्सची गरज वाढते आहे तशीच ती ‘पॉकेट फ्रेंडली’ असावी अशीही लोकांची मागणी आहे. खिशात किंवा बॅगमध्ये सहज मावू शकतील अशा गॅजेट्सना जगभरातील लोकांची पसंती मिळत असल्यामुळे, गॅजेट्सची निर्मिती करणाऱ्या कंपन्याही छोट्या आकाराची गॅजेट्स बनवण्यावर भर देत आहेत.

‘तांदुळा’इतका छोटा कॉम्प्युटर

याच पार्श्वभूमीवर आयबीएम या जगविख्यात कंपनीने अत्यंत लहान आकाराचा कॉम्प्युटर बनवला आहे. या कॉम्प्युटरला ‘जगातील सर्वात छोटा कॉम्प्युटर’ घोषित करण्यात आला आहे. नुकतंच आयबीएम कंपनीने त्यांच्या ‘थिंक २०१८’ या सेमिनारमध्ये हा छोटासा कॉम्प्युटर लाँच केला.

- Advertisement -
फोटो सौजन्य-news.umich.edu

सर्वात छोट्या कॉम्प्युटरची वैशिष्ट्यं

  • हा लहानगा कॉम्प्युटर ही केवळ १ मिलीमीटर बाय १ मीलीमीटर आकारमान असलेली चौरस आकारातली चीप आहे.
  • तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ही चीप १९९० साली वापरण्यात येणार्‍या ‘एक्स८६’ या संगणकाच्या वेगाने कार्य करते.
  • या छोट्याशा चीपमध्ये आयबीएम कंपनीने एकूण १ दशलक्ष ट्रान्झीस्टर्सच्या क्षमतेएवढी क्षमता एकत्रित केली आहे.
  • आयबीएमच्या म्हणण्यानुसार, खरंतर याहीपेक्षा कित्येक पटीने वेगवान कंप्युटींग आजच्या स्मार्टफोनमध्ये होत असतं. मात्र, ज्यांना फार वेगाची अपेक्षा नाही अशा युजर्सना हा कॉम्प्युटर नक्कीच लाभदायक ठरु शकतो.
  • विशेष म्हणजे या कॉम्प्युटरचे उत्पादन मूल्य केवळ ७ रुपयांच्या आसपास इतकंच आहे.
  • या कॉम्प्युटरमध्ये सपोर्ट करत असलेलं ब्लॉकचेन सारखं अद्ययावत तंत्रज्ञान, ‘क्रिप्टोकरन्शी’शी संबधित सर्व अॅप्सना सपोर्ट करतं.

दरम्यान सध्या या कॉम्प्युटरचा फक्त प्रोटोटईप सादर करण्यात आला असून, येत्या ५ वर्षांत हे ‘छोटे काँप्युटर’ बाजारात विक्रीसाठी उतरवणार असल्याची आशा, आयबीएमच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -