घरटेक-वेक'टॅक्सी' जी उडणार आकाशात...

‘टॅक्सी’ जी उडणार आकाशात…

Subscribe

ही हायब्रीड फ्लाईंग टॅक्सी २०२० साली प्रत्यक्षात उड्डाण घेईल, असा दावा रोल्स-रॉईस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. लवकरच या टॅक्सीचं पहिलं मॉडेल रिलीज केलं जाईल.

जगात नेहमीच नवनवीन शोध लावले जातात. तसंच अनेक नाविण्यपूर्ण आणि लोकोपयोगी संकल्पनाही मांडल्या जातात. रोल्स-रॉईस या ब्रिटीश कंपनीने अशीच एक भन्नाट संकल्पना मांडली आहे. रोल्स-रॉईसने नुकतीच एका हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनाची संकल्पना मांडली असून त्याला ‘फ्लाईंग टॅक्सी’ असं नाव दिलं आहे. येत्या काही वर्षांत या अत्याधुनिक फ्लाईंग टॅक्सींची निर्मीती करणार असल्याचं रोल्स-रॉईसकडून सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ही फ्लाईंग टॅक्सी सरळ रेषेत वर उडू शकते आणि तशीच्या तशी खली उतरु शकते. त्यामुळे तिच्या टेकॉफ-लँडिंगसाठी खूपच कमी जागा लागेल. येत्या ५ वर्षांत ही फ्लाईंग टॅक्सी बनवून पूर्ण होईल, असा दावा रोल्स-रॉईस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. रोल्स-रॉईसने ही घोषणा केल्यानंतर जगभरातील लोकांमध्ये या फ्लाईंग टॅक्सीविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. हा शोध तंत्रज्ञानाच्या जगात भविष्यामध्ये क्रांती आणणरा ठरेल हे नक्की.

flying taxi rolls royce
प्रातिनिधिक फोटो

२०२० साली घेणार उड्डाण

दरम्यान पुढील १८ महिन्यांमध्ये या फ्लाईंग टॅक्सीचं पहिलं मॉडेल तयार होईल, असं रोल्स-रॉईसच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. ही टॅक्सी वीजेवर चालणारी असल्यामुळे इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होईल, असंही निर्मात्यांचं म्हणणं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एका फ्लाईंग टॅक्सीमध्ये ४ ते ५ लोक एकावेळी बसू शकतात. तसंच ही टॅक्सी ३०० किलोमीटर/प्रतितास इतक्या वेगाने अंतर कापू शकते. या हायब्रिड वाहनामध्ये ट्रेडिशनल गॅस टर्बाईन इंजिनसोबत इलेक्ट्रीक सिस्टीम जोडण्यात येणार आहे. दरम्यान ही भन्नाट फ्लाईंग टॅक्सी २०२० पर्यंत प्रत्यक्षात उड्डाण घेईल, अशी आशा रोल्स-रॉईस कंपनीने व्यक्त केली आहे.

- Advertisement -
flying taxi rolls royce
प्रातिनिधिक फोटो

रोल्स-रॉईस प्रमाणेच जगभारतील अन्य काही नावजलेल्या कंपन्या अशाचप्रकारे फ्लाईंग टॅक्सीच्या संकल्पनेवर काम करत असल्याचं समजत आहे. यामध्ये उबर, किटी हॉक (गुगलची सहाय्यक कंपनी), जर्मनीची लिलिअम एव्हिएशन, फ्रान्सची सॅफ्रन आणि अमेरिकेची हनीवेल आदी कंपन्यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -