Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर टेक-वेक भारतात रॉयल एनफिल्डच्या 'या' बाईक्स होणार बंद?

भारतात रॉयल एनफिल्डच्या ‘या’ बाईक्स होणार बंद?

भारतीय बाजारपेठेत रॉयल एनफिल्ड ५०० सीसीच्या बाईक्स बंद करण्याची शक्यता

Related Story

- Advertisement -

भारतीय बाजारपेठेत रॉयल एनफिल्ड ५०० सीसीच्या बाईक्स बंद करण्याची शक्यता आहे. भारतात कंपनीकडून ५०० सीसी बुलेटसह Classic ५०० आणि Thunderbird ५०० अशा बाईक्सची विक्री केली जाते. एचटी मिंटने सादर केलेल्या अहवालात या बाईक्सचे सध्याचे इंजिनला बीएस ६ एमिशन नॉर्म्सनुसार ही इंजिन अपग्रेड करण्यासाठी लागणार खर्च हा अधिक आहे तसेच या बुलेटची मागणी देखील कमी झालेल्या कंपनीकडून हे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

मागणी असणाऱ्या बुलेटचे होणार अपग्रेडेशन

- Advertisement -

भारतात या बुलेटशिवाय कंपनीकडून ३५० सीसी रेंजच्या बुलेटला अपग्रेड करणार आहे. रॉयल एनफिल्डची ३५० सीसीचे इंजिन बीएस ६ मध्ये अपग्रेड करावं लागणार असल्याने अपग्रेडेड एडिशन लवकरच भारतात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

रॉयल एनफिल्ड ५०० सीसीच्या गाड्यांचे अपग्रेडेशन करून एक्सपोर्ट मार्केटसाठी तयार करण्यात आले होते. २००९ साली एका लाइटवेट युनिट कंस्ट्रक्शन इंजिन प्लॅटफॉर्मचा वापर करुन ही बाईक पुन्हा लाँच केली होती, त्यावेळी या बाईकची मागणी भारतात वाढली होती. सध्या कंपनी त्यांच्या नियोजनानुसार योग्य मार्गावर आहे. वेळेनुसार आवश्यक बाईक्समध्ये अपग्रेडेशन बदल केले जातील, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.


‘रॉयल एनफिल्ड बुलेट ट्रायल्स’ लवकरच होणार लॉंच
- Advertisement -