सॅमसंग गॅलेक्सी ऑन ६ भारतात लाँच

तरूण पिढी लक्षात ठेवून गॅलेक्सी ऑन ६ बनवण्यात आला आहे. यामध्ये चॅट ओव्हर व्हिडिओ, ६४ जीबी स्टोरेज आणि एलईडी फ्लॅशसह सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. काय आहे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन खास तुमच्यासाठी.

Mumbai
samsung_galaxy_on6
सॅमसंग गॅलेक्सी ऑन ६

बऱ्याच काळानंतर सॅमसंगचा मोस्ट अवेटेड फोन बाजारात आला आहे. सॅमसंगनं नव्या ऑन सिरीजमधील गॅलेक्सी ऑन ६ भारतात लाँच केला आहे. इन्फिनिटी डिस्प्लेसह असणाऱ्या या फोनमध्ये १५ टक्के जास्त डिस्प्ले एरिया देण्यात आला आहे. त्यामुळं या फोनचा आकारदेखील वाढला आहे. तरूण पिढी लक्षात ठेवून गॅलेक्सी ऑन ६ बनवण्यात आला आहे. यामध्ये चॅट ओव्हर व्हिडिओ, ६४ जीबी स्टोरेज आणि एलईडी फ्लॅशसह सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तर गॅलेक्सी ऑन ६ ची टक्कर शाओमी रेडमी नोट ५ प्रो आणि रियलमी १ व्हेरियंटसह आहे असं म्हटलं जात आहे.

कुठे मिळेल?

सध्या तरी गॅलेक्सी ऑन ६ एक्स्क्लुझिव्हली फ्लिपकार्टवर मिळेल आणि ५ जुलैपासून सॅमसंगच्या स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. गॅलेक्सी ऑन ६ ची किंमत सध्या १४,४९० रुपये असून फ्लिपकार्टवरून खरेदी केल्यास, १ हजार रूपयांची सूट मिळणार आहे.

काय आहेत स्पेसिफिकेशन?

गॅलेक्सी ऑन ६ मध्ये ५.६ इंच (७२० x १४८० पिक्सल) एचडी + सुपर एमोलेड इन्फिनिटी डिस्प्ले असून आस्पेक्ट रेशो १८.५:९ आहे. मल्टिटास्किंगसाठी फोनमध्ये १.६ गीगहर्ट्ज ऑक्टोकोअर एक्सीनॉस ७८७० प्रोसेसर वापरण्यात आलं आहे. ग्राफीक्ससाठी एआरएम माली टी ८३० एपी१ असून गॅलेक्सी ऑन ६ मध्ये ४ जीबी रॅम आहे. इनबिल्ट स्टोरेज ६४ जीबी आहे, तर मायक्रोएसडी कार्ड २५६ पर्यंत स्टोरेज वाढवता येणार आहे.

कसा आहे कॅमेरा?

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये अपर्चर एप/१.९ सह १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे, जो एलईडी फ्लॅशसह असेल. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्लॅशसह ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. सेल्फी चांगली यावी यासाठी सेल्फी फोकस आणि ब्यूटी मोडसारखे फीचर्स देण्यात आले असून सुरक्षेसाठी फेस अनलॉक फीचर आणि फिंगरप्रिंट स्कॅनरसुद्धा देण्यात आलं आहे.

खास फीचर काय आहेत?

चॅट ओव्हर व्हिडिओ हे खास फीचर यामध्ये असून युजर्स व्हिडिओ बघतानाच चॅटदेखील करू शकतील. सॅमसंगचा हा हँडसेट ड्युएल सिम असून मायक्रोएसडी कार्डासाठी असे एकूण तीन स्लॉट यामध्ये देण्यात आले आहेत. तर, गॅलेक्सी ऑन ६ मध्ये अॅन्ड्रॉईड ओरियो ८.० ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणार आहे. याची बॅटरी ३००० एमएएच इतकी असून ४ जी व्हीओएलटीई, ब्ल्यूटूथ ४.२, वाय-फाय, ऑडिओ जॅक आणि रेडिओसारखे फीचर्ससुद्धा देण्यात आले आहेत. हँडसेटचं डायमेन्शन ७०.२X१४९.३X८.२ मिलीमीटर असून १५३ ग्रॅम वजन आहे.