घरटेक-वेकसॅमसंग गॅलेक्सी A51 आज होणार भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

सॅमसंग गॅलेक्सी A51 आज होणार भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

Subscribe

सॅमसंग गॅलेक्सी A51 आज भारतात लाँच होणार असून त्याची किंमत काय असेल याची उत्सुकता आहे. त्याआधी या मोबाईलचे फिचर जाणून घेऊयात...

सॅमसंग कंपनीचा एक नविन मोबाईल आज भारतात लाँच होणार आहे. गॅलेक्सी A51 असं या मोबाईलचे नाव आहे. दक्षिण कोरियातील मोबाईल उत्पादक कंपनीने सोमवारी याबद्दलची माहीती त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली. भारत हा दुसरा देश आहे जिथे हा मोबाईल लाँच होणार आहे. या मोबाईलची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. यापूर्वी गॅलेक्सी A51 आणि गॅलेक्सी ७१ ला कंपनीने व्हिएतनाममध्ये लाँच केले होते. दोन्ही स्मार्टफोनमध्ये इनफिनिटी ओ डिस्प्ले म्हणजेच होल पंच डिस्प्ले आणि क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप आहे.

काय आहे सॅमसंग गॅलेक्सी A51 ची किंमत

सॅमसंग गॅलेक्सी A 51 आज भारतात लाँच होणार असून त्याच्या किंमतीच्या चर्चा सर्वत्र रंगत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या मोबाईलची किंमत २२,९९० रूपये एवढी असू शकते. परंतु कंपनीने मोबाईलची किमंत अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. वियतमानमध्ये या मोबाईलची विक्री किंमत ही २४,६०० रूपये इतकी आहे.

सॅमसंग गॅलेक्सी A51 ही’ आहेत खास वैशिष्ट्ये

डिस्प्ले – तसेच हा मोबाईल पिंक, व्हाईट आणि ब्ल्यू अश्या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. या मोबाईलचा ६.५ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे.

रॅम – सॅमसंग A51 मोबाईलमध्ये ६ जीबी रॅम उपलब्ध करून दिलेले आहे.

स्टोरेज – १२८ जीबी स्टोरेज दिले आहे, गरज भासल्यास ती ५१२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.

कॅमेरा – प्राथमिक सेन्सर ४८ मेगापिक्सेल, दुय्यम कॅमेरा १२ मेगापिक्सेल तर ५ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आणि सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा सेन्सरचा देखील यात समावेश आहे.

बॅटरी – या मोबाईलला ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच १५ व्हॅटचा चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -