सॅमसंगचे दोन नवीन स्मार्टफोन २ जून रोजी भारतात लाँच होणार

Mumbai
samsung smartphones

सॅमसंग स्मार्टफोन कंपनी सॅमसंग गॅलेक्सी एम ११ (Samsung Galaxy M11) आणि गॅलेक्सी एम०१ (Galaxy M01) हे दोन स्मार्टफोन २ जून रोजी भारतात लाँच करणार आहे, अशी माहिती फ्लिपकार्टने एका टिझरद्वारे दिली आहे. अधिकृतरीत्या लाँच झाल्यानंतर लवकरच दोन्ही सॅमसंग स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असतील. सॅमसंग Galaxy M11 ला Galaxy M10 आणि Galaxy M10s चा अपग्रेड व्हर्जन म्हणून लाँच केलं आहे. दुसरीकडे, Galaxy M01 हे दक्षिण कोरियन कंपनीचे एक नवीन उत्पादन असेल. फ्लिपकार्टवर रिलीज झालेल्या टीझरमध्ये लाँचच्या तारखेसह Galaxy M01 च्या काही वैशिष्ट्यांविषयी माहिती देण्यात आली आहे.

फ्लिपकार्टने आपल्या मोबाइल साइट आणि अॅपद्वारे सॅमसंग Galaxy M11 आणि Galaxy M01 साठी एक समर्पित टीझर जारी केला आहे. या टीझरमध्ये लाँचच्या तारखेविषयी माहिती देण्यात आली आहे. टीझरनुसार लाँचिंग दुपारी १२ वाजता होईल. रिलीज झालेल्या टीझरमध्ये दोघांच्या किंमतींबद्दल काहीही सांगण्यात आलेलं नाही. मात्र, Galaxy M11 ची प्रारंभिक किंमत १०,९९९ रुपये आणि Galaxy M01 ची प्रारंभिक किंमत ८,९९९ रुपये असू शकते.


हेही वाचा – Moto G8 Power Lite स्मार्टफोनची आजपासून विक्री, किंमत ८,९९९ रुपये


सॅमसंग Galaxy M11 यापूर्वीच युएईमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनला ६.४ इंचाचा डिस्प्ले, ऑक्टा-कोर प्रोसेसर, 13MPचा प्रायमरी कॅमेरा आणि 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फ्लिपकार्ट टीझरमधील Galaxy M01 विषयी दिलेल्या माहितीनुसार हा फोन ड्युअल रीअर कॅमेरा सेटअपसह येईल. त्याचा प्राथमिक कॅमेरा 13MPचा असेल. तसेच यामध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात देण्यात आली आहे.