सॅमसंग गॅलक्सी नोट १०,नोट १० प्लस आज होणार लाँच

८ ऑगस्टपासूनच या दोन्ही स्मार्ट फोनची प्री-बुकिंग सुरू

Mumbai

सॅमसंगच्या आज झालेल्या गॅलक्सी अनपॅक्ड कार्यक्रमात Samsung Galaxy Note 10 व Note 10 Plus हे दोन फोन्स लाँच करण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला हे दोन्ही स्मार्टफोन न्यूयॉर्कमध्ये लाँच करण्यात आले होते. तेच दोन स्मार्ट फोन आज भारतात लाँच करण्यात येणार आहे.

कंपनीकडून या दोन्ही स्मार्ट फोन लाँचच्या पुर्वीच त्यांची किंमत जाहीर केली होती. तसेच, सॅमसंग गॅलक्सी नोट १०,नोट १० प्लस हे दोन्ही फोन कंपनीने प्री-ऑर्डरसाठीही उपलब्ध करून दिले आहेत. मात्र या फोनची विक्री २३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

 

८ ऑगस्टपासूनच या दोन्ही स्मार्ट फोनची प्री-बुकिंग सुरू झाली असून ही प्री-बुकिंग २२ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. सॅमसंग गॅलक्सी नोट १०,नोट १० प्लस या दोन्ही स्मार्ट फोन ग्राहकांना सॅमसंगच्या संकेतस्थळासह फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, पेटीएम आणि टाटावर प्री-बुकिंगसाठी उपलब्ध असणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी नोट १० + चे फिचर्स

१०+१२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह उपलब्ध असणाऱ्या फोनची किंमत ७९,९९९ रूपये असून असे आहेत त्याचे फिचर्स

 • पूर्ण स्क्रीन व्यापणारा Infinity-O डिस्प्ले
 • सेल्फी कॅमेरासाठी होलपंच प्रकारचा कॅमेरा
 • Bokeh video द्वारे व्हिडिओला सुद्धा बॅकग्राऊंड ब्लर उपलब्ध
 • व्हिडिओ एडिटरचा समावेश
 • फिंगरप्रिंट स्कॅनर डिस्प्लेखालीच समाविष्ट
 • Samsung DeX द्वारे पीसी व मॅकला जोडून पूर्ण डेस्कटॉप प्रमाणे वापरता येईल

सॅमसंग गॅलेक्सी नोट १० चे फिचर्स

 • १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजसह उपलब्ध असणाऱ्या फोनची किंमत ८९,९९९ रूपये असून असे आहेत त्याचे फिचर्स
 • एंड्राइड ९ (पाई) ऑपरेटिंग सिस्टम
 • ६.३ इंच चा एफएचडी प्लस स्क्रीन
 • AMOLED इंफिनिटी O डिस्प्ले पूर्ण एचडी प्लस रिझॉल्यूशन
 • सॅमसंग गॅलेक्सी नोट १० ट्रिपल रियर कॅमेरा