आज भारतात लाँच होतायत ‘हे’ जबरदस्त फोन, जाणून घ्या फिचर्स

आज भारतात लाँच होतायत 'हे' जबरदस्त फोन, जाणून घ्या फिचर्स

आज भारतात दोन जबरदस्त स्मार्टफोन लाँच होणार आहेत. सॅमसंग (Samsung) कंपनीचा Samsung Galaxy S20 FE आणि Poco C3 स्मार्टफोन लाँच होत आहे. गेल्या महिन्यात सॅमसंगच्या या नव्या स्मार्टफोनचे ग्लोबल लाँचिंग झाले होते. हा स्मार्टफोन Galaxy S20 फ्लॅगशिपचा टोन्ड-डाऊन व्हर्जन आहे. याला सॅमसंग Galaxy S20 फॅन एडिशन नावाने देखील ओळखले जाते. सॅमसंगचा हा स्मार्टफोन ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 120Hz डिस्प्लेसह येतो.

तर Poco C3 बद्दल बोलायचे झाले तर माहितीनुसार, मलेशियात यावर्षी लाँच झालेल्या Redmi 9C चा रिब्रँडेड व्हर्जन असू शकतो. Poco C3 लाँच झाल्यानंतर या स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाईल. या स्मार्टफोनच्या लाँच झालेल्या टीझरच्या माध्यमातून अशी माहिती मिळाली आहे की, या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी, ट्रिपल रिअर कॅमेरा, 4GB रॅम आणि HD+ रिझोल्यूशनसह डिस्प्ले येईल. Poco C3 चा लाँच इव्हेंट आज दुपारी १२ वाजता सुरू होईल. या इव्हेंटची लाईव्ह स्ट्रीमिंग लोको गेम स्ट्रीमिंग App, Rheo TV, गेमिंग मॉन्क, यूट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर होईल. याबाबत पोको कंपनीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.

दरम्यान सॅमसंग कंपनीचा Samsung Galaxy S20 FE स्मार्टफोन भारतात फक्त 4G सपोर्टसह लाँच होणार आहे. याचे ग्लोबल व्हेरिएंटमध्ये 4G आणि 5G असे दोन सपोर्ट दिले गेले आहेत. गॅजेट्स ३६०च्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन फक्त 8GB + 128GB व्हेरिएंट आणि पाच कलर ऑप्शनमध्ये लाँच केला जाईल. या कलर ऑप्शनमध्ये क्लाउड रेड, क्लाउड लेवेंडर, क्लाउड मिटं, क्लाउड नेव्ही, आणि क्लाउड व्हाइट आहे. तर ग्लोबर व्हेरिएंटमध्ये 6GB RAM + 128GB, 8GB + 128GB आणि 8GB + 256GB व्हेरिएंट्स आणि एकूण सहा कलर ऑप्शनमध्ये लाँच केला गेला आहे. क्लाउड ऑरेंज ऑप्शनला भारतात लाँच केले नाही आहे.

Poco C3 चे फिचर्स

माहितीनुसार, Poco C3 या स्मार्टफोनच्या 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत १० हजार ९९० रुपये असेल. मलेशियामध्ये Redmi 9C च्या 2GB रॅम + 32GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत MYR 429 (भारतीय किंमतीत जवळपास ७ हजार ५०० रुपये)मध्ये लाँच केले आहे. जर Poco C3 खरंच Redmi 9C च्या रिब्रँडेड व्हर्जनसह लाँच होत असेल तर हा व्हेरिएंट भारतातही येऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप नॉचसह HD+ डिस्प्ले असेल. तसेच यासोबत 4GB पर्यंत रॅमची ऑफर असू शकते. यामध्ये रिअर कॅमेरा सेटअप मिळेल, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 13MP असेल. तसेच यामध्ये 5,000mAh बॅटरी दिली जाईल.

Samsung Galaxy S20 FEचे फिचर्स

हा स्मार्टफोन अँड्रॉइड १० बेस्ड One UI 2.0 चालतो आणि यामध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह ६.५ इंच फूल HD+ (1,080×2,400 पिक्सल) सुपर AMOLED डिस्प्ले दिला गेला आहे. यामध्ये 8GB रॅमसह Exynos 990 प्रोसेसर आहे.

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमधील रिअरमध्ये 12MPचा प्रायमरी कॅमेरा, 12MPचा सेकेंडरी कॅमेरा आणि 8MPचा थर्ड कॅमेरा दिला आहे. याचा फ्रंट कॅमेरा 32MPचा आहे, याची बॅटरी 4,500mAh असून यात 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला गेला आहे. यामध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देखील दिला आहे.