घरटेक-वेकSAMSUNG चा नवा फ्रीज; यासोबत ३८ हजारांचा मोबाईल आणि ९ हजार कॅशबॅकही

SAMSUNG चा नवा फ्रीज; यासोबत ३८ हजारांचा मोबाईल आणि ९ हजार कॅशबॅकही

Subscribe

SAMSUNG ने आजच एक नवा फ्रीज लॉंच केला असून या फ्रीजसोबत ३८ हजारांचा मोबाईल आणि ९ हजार कॅशबॅकही मिळणार आहे.

सॅमसंग कंपनीने एक नवीन फ्रीज लॉंच केला आहे. विशेष म्हणजे अनेक शानदार फीचर्स असलेला हा प्रीमियम सेगमेंटमधला फ्रीज फ्लिपकार्ट, Samsung.com आणि अन्य ऑनलाइन स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. हा फ्रीजचे नाव SpaceMax Family Hub असे असून आजपासूनच याचे प्री-बुकिंग सुरु झाले असून येत्या २६ जुलैपर्यंत हे उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे या फ्रीजसोबत तुम्हाला ३८ हजारांचा मोबाईल शिवाय ९ हजार कॅशबॅकही मिळणार आहे.

फ्रीजचे भन्नाट फीचर्स

SpaceMax Family HubTM फ्रीज फोनद्वारे कनेक्ट करता येतो. याशिवाय फ्रीजच्या दरवाजावर २१.५ इंच फुल एचडी टच स्क्रीन डिस्प्ले असून २५ डब्ल्यू स्पीकर आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीचे टीव्ही शो किंवा सिनेमे या फ्रीजवर बघू शकता. प्रीमियम ब्लॅक मॅट फिनिश असलेल्या या फ्रीजमध्ये ६५७ लीटर स्टोरेज क्षमता आहे. घरातील अन्य स्मार्ट डिव्हाइसलाही हा फ्रीज कनेक्ट होतो.

- Advertisement -

फीर्जची जाणून घ्या किंमत

या फ्रीजची किंमत २ लाख १९ हजार ९०० रुपये इतकी आहे. परंतु, हा फ्रीज तुम्हाला ऑफर्समध्ये १ लाख ९६ हजार ९९० रुपयांच्या स्पेशल किंमतीसह खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे या फ्रीजसोबत Galaxy Note 10 lite फोन दिला जाणार आहे. त्यासोबतच १३ ते २६ जुलै दरम्यान, प्री-बुकिंग करणाऱ्यांना कंपनीकडून ९ हजार कॅशबॅकही दिला जाणार आहे. तसेच दहा वर्षांची वॉरंटी मिळणार आहे.


हेही वाचा – शानदार लूकसह MG Hector Plus लाँच; बुकिंग सुरू!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -