घरटेक-वेकसॅमसंग बनवणार १० लाख फोल्ड करता येणारे मोबाईल

सॅमसंग बनवणार १० लाख फोल्ड करता येणारे मोबाईल

Subscribe

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स करणार फोल्डेबल फोन्सचे उत्पादन

Royole Corporation ने गेल्या आठवड्यात त्यांचा फोल्ड होणारा ‘FlexPai’ फोन रिलीज केला. आत्ता बऱ्याच कंपन्या फोल्डेबल फोन्सची निर्मिती करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी पुढील वर्षीच्या पहिल्या सहामहीत आपल्या फोल्डेबल फोनची विक्री करणार आहे. कमीतकमी १० लाख फोनचे उत्पादन करण्याचा मानस कंपनीचे स्मार्टफोन मुख्य डी. जे. कोह यांनी बुधवारी फ्रान्सिस्को येथील घडलेल्या विकास परिषदेत बोलून दाखवला.

दक्षिण कोरियातील सुवान येथे स्थित असलेल्या कंपनीने आपल्या फोल्डेबल फोनची एक झलक सुध्दा या परिषदेत दिली. परंतु या फोनची किंमत, त्याचे नाव आणि मोबाईल कधीपर्यंत बाजारात येईल याबद्दल कंपणीने कोणतीही माहिती दिलेली नाही.

- Advertisement -

‘कोह हे’ सॅमसंगच्या मोबाईल कम्युनिकेशन्सच्या व्यवसायाचे अध्यक्ष आहेत. परिषदेनंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, काहीही झाले तरी ते पुढच्या वर्षीच्या सहामहीत हा फोन लॉन्च करतील. तसेच सॅमसंगच्या फ्लॅगशिप फोनसारखे, जसे की Galaxy S9 प्रमाणे हा फोल्डेबल फोनसुध्दा दर वर्षी एका नव्या रूपात मार्केटमध्ये येईल. मार्केट रिसेप्शनच्या आधारावर कंपनी त्यांच्या फोल्डेबल फोनच्या उत्पादनाचे प्रमाण वाढवू शकते, असेही कोह यांनी सांगितले.

वाचा – फोल्ड होणारा स्मार्टफोन, पाहा भन्नाट फिचर्स

- Advertisement -

गेल्या वर्षी सॅमसंगने ३०० दशलक्षपेक्षा जास्त फोनचे उत्पादन केले. जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन निर्माता असलेल्या सॅमसंगने दोन महिन्यांपूर्वी Google च्या सीईओ सुंदर पिचाई यांच्याशी चर्चा केल्यानंतर फोल्डेबल फोनसाठी सॉफ्टवेअर इंटरफेस विकसित करण्यासाठी Google सोबत एक करार केला आहे.

जगभरातील युजर्स आपला डिव्हाइस अपग्रेड करण्यासाठी खूप काळ थांबतात, त्यासाठी सॅमसंग आणि इतर स्मार्टफोन निर्माते धीम्या झालेल्या स्मार्टफोनच्या मागणीला पुनरूज्जीवित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच पुढच्या वर्षी सॅमसंगच्या प्रमुख S10 ची स्वस्त आवृत्ती ग्राहकांसाठी लॉन्च करणार असल्याचे ब्लूमबर्ग या वृत्तसमूहाने सांगितले.

5G ने सॅमसंगला पुढच्या वर्षी मोठी संधी निर्माण केली आहे, असे कोह म्हणाले. तसेच 5G मोबाईल नेटवर्क युजर्सना उपलब्ध करून देण्याची योजना नऊ महिन्यांनी पुढे ढकलण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -