मोबाईलच्या कॅमेराची क्लॅरिटी दाखवण्यासाठी वापरली शक्कल

मोबाईलच्या कॅमेराची क्लॅरिटी दाखवण्यासाठी जाहिरातीमध्ये त्याच मोबाईलमध्ये काढलेले फोटो दाखवण्यात येतात. मात्र हे फोटो नक्की त्याच मोबाईलमध्ये काढले जातात का? हे प्रथम तपासून नंतरच मोबाईल खरेदी करा.

Mumbai
Samsung used DSLR photo to promote new model
मोबाईलच्या कॅमेराची क्लॅरिटी दाखवण्यासाठी वापरली क्षक्कल

प्रत्येक जण आजकाल नविन येणारे मोबाईल फोन खरेदी करत असतात. त्यामुळे सध्या मार्केटमध्ये मोबाईल कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक कंपनी आपल्या मोबाईलची विक्री करण्यासाठी वेगवेगळे फंडे देखील वापर असतात. यातील काही कंपन्या टीव्ही आणि ऑनलाईनवर जाहिराती करुन उत्पादनाचा खप वाढण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र या जाहीरातील कितपत खऱ्या असतात हे कोणी देखील सांगू शकत नाही. असेच एका कंपनीचे सत्य उघड झाले आहे. सॅमसंगने एक नवीन स्मार्टफोन ग्राहकांच्या भेटीस आणला आले मात्र या कंपनीने जाहीरातीकरता ज्या कॅमेराची क्लॅरिटी दाखवली आहे ते फोटो डीएशएलआरचे फोटो वापरल्याचे उघड झाले आहे.

हा आहे सॅमसंगचा नवा फोन

सॅमसंग कंपनींने एक नवीन फोन ग्राहकांच्या भेटीस आणला आहे. Samsung Galaxy A8 Star असे या मोबाईलचे नाव आहे. या मोबाईलच्या कॅमेराची गुणवता दाखवण्यासाठी त्या मोबाईलमधून फोटो काढणे अपेक्षित असते. मात्र सॅमसंग कंपनींने ग्राहकांची फसवणूक करत डीएसएलआर कॅमेरा वापरुन फोटो काढून ते आपल्या जाहीरातीसाठी वापरले आहेत.


वाचा – मोबाईलच्या चार्जिंगची चिंता मिटली


असे प्रकरण आले उघडकीस

Dunja Djudjic या फोटोग्राफरने एक फोटो काढला होता. या फोटोग्राफरने काढलेले हे फोटो गेट्टीवर विकले जात आहेत असे त्यांनी इमेलद्वारे कळाले. त्यानंतर त्यांनी सर्व प्रकरणावर संशोधन केले त्यानंतर सत्य उघडकीस आले. या फोटोग्राफरने काढलेले फोटो सॅमसंग आपल्या जाहिरातीकरता वापरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सॅमसंगने आपले फोटो खरेदी केले असल्याचे कंपनीला विचारण्यात आले. मात्र आमच्याकडे याबाबत कोणताही डेटा आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर Djudjic यांनी सॅमसंगच्या मलेशिया ऑफिस आणि सॅमसंग ग्लोबल ऑफिसशी संपर्क केला. मात्र या ठिकाणीही कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. या आधी देखील कंपनी असलेल्या हुवावे या कंपनीवर अशाप्रकारे इमेज चोरल्याचे आरोप लावण्यात आले होते.


वाचा – त्या मोबाईलमुळे मुद्देमाल परत मिळाला


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here