घरटेक-वेकआयफोन नंतर ही कंपनी देखील मोबाईलसोबत चार्जर, इयरफोन देणार नाही

आयफोन नंतर ही कंपनी देखील मोबाईलसोबत चार्जर, इयरफोन देणार नाही

Subscribe

Samsung आता Apple च्या पावलावर पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे. Apple च्या iPhone 12 नुसार Samsung आता Samsung Galaxy S21 फोनसोबत हेडफोन्स आणि चार्जर देणार नाही आहे, असं वृत्त समोर येत आहे. ताज्या अहच्या या निर्णयामुळे केवळ पर्यावरणाला फायदा होणार आहे. शिवाय, सॅमसंगला त्यांच्या कमाईचं प्रमाण वाढविण्यातही मदत होईल. असं म्हटलं जात आहे की रिटेल बॉक्समध्ये चार्जर आणि हेडफोन काढून टाकल्यानंतरही सध्या Samsung Galaxy S21 मॉडेलची किंमत कमी होणार नाही आहे.

सॅममोबाईलच्या अहवालात दक्षिण कोरियन माध्यमांचा हवाला देत असं म्हटलं आहे की सॅमसंग त्याच्या Galaxy S21 रीटेलर बॉक्समधून इन-बॉक्स चार्जर तसंच हेडफोन्स काढून टाकण्याचा विचार करीत आहे. हा बदल केवळ सॅमसंग गॅलेक्सी एस २१ मॉडेलपुरता मर्यादित राहणार नाही तर गॅलेक्सी एस २१ प्लस (Galaxy S21 Plus) आणि गॅलेक्सी एस २१ अल्ट्रा (Galaxy S21 Ultra) या फोन सोबत देखील चार्जर आणि हेडफोन्स दिले जाणार नाही आहेत.

- Advertisement -

अहवालात असंही म्हटलं आहे की अशी अटकळ केली जात आहे की सॅमसंग त्याच्या गॅलेक्सी ए २१ (Galaxy A21) स्मार्टफोनच्या रिटेलर बॉक्समधून हेडफोन्स काढण्याची शक्यता आहे. सॅमसंगने या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. Apple ने पुढील वर्षापासून आपल्या नवीन स्मार्टफोनसह बॉक्समधील सामग्री समाविष्ट न करण्याचा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा – एका इलेक्ट्रिक स्कूटरवर एक स्कूटर फ्री; ही कंपनी देतेय खास ऑफर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -