फेसबुक झालं अपडेट ‘हे’ आहेत नवे फीचर्स

फेसबुकचे सीईओ मार्क जुकेरबर्ग यांनी सोशल मीडियातील प्रसिद्ध असणाऱ्या फेसबुकचे नवे डिझाईन जारी केले आहेत

Mumbai

फेसबुकने आपल्या F8 developer conference च्या पहिल्या दिवशी काही मोठ्या गोष्टींचा खुलासा केला. फेसबुकचे सीईओ मार्क जुकेरबर्ग यांनी सोशल मीडियातील प्रसिद्ध असणाऱ्या फेसबुकचे नवे डिझाईन जारी केले आहेत. या नव्या सादर केलेल्या वैशिष्ट्यांपैकी नव्या डिझाईनमध्ये न्यूज फीड फीचर्स बदलण्यात येणार आहे. याशिवाय फेसबुक सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या खाजगी बाबीवर लक्ष केंद्रीत केले आहे. या नव्या डिझाईनमध्ये फेसबुक मॅसेंजिंग अॅप, ऑनलाईन मार्केट प्लेस आणि व्हिडिओ ऑन डिमांड साईटला शोकेस करण्यात आले आहे.

Today at F8, I talked about how we're starting to build out a privacy-focused social platform.For the last 15 years,…

Mark Zuckerberg ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 30, 2019

Facebook Redisign

या फेसबुकच्या नवीन अपडेटला FB5 असे संबोधण्यात येते. या अपडेटमध्ये ग्रृप्स आणि इव्हेंट्सला हायलाईट करण्यात आले आहे. जर एखाद्या ग्रृपला जोडल्यानंतर युजर्सना पर्सनलाईज न्यूज फीडच्या अपडेट मिळू शकतात, जे युजर्सच्या फेसबुकवरील मित्रांच्या ओळखीतील असतील. यासोबत ग्रृप इंटरअॅक्शन हा पर्याय ही उपलब्ध होणार आहे.
Meet New Friends च्या पर्यायामध्ये अनोळखी लोकं असतील पण त्यात ओळखीच्या लोकांना शोधणे शक्य होणार आहे. यासह जवळपास होणाऱ्या इवेंट्सची माहितीही मिळणार आहे.

Instagram

फेसबुकच्या F8 च्या दरम्यान Instagram मॅसेंजिंग अॅपकरिता ही काही फीचर्सची घोषणा केली आहे. आता इंस्टाग्रामच्या कॅमेरा इंटरफेसमध्ये Create Mode चा पर्याय मिळणार आहे. शॉपिंगच्या दृष्टीने इंस्टाग्राम या सोशल मीडियावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. या अॅपच्या मदतीने युजर्सना शॉपिंग करता येणार आहे. याचे सर्व फीचर्स सध्या कॅनडातील लोकांना ट्रायलसाठी देण्यात येणार आहे.

फेसबुक ‘डेटिंग’ फीचर

फेसबुकने हे फीचर मागच्या वर्षाच लॉंच केले होते, आता १४ देशांमध्ये हे फीचर्स सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये अजून एक फीचर अॅड करण्यात आले आहे. त्याला Secret Crush असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये फेसबुकच्या मित्रांची सिक्रेट लीस्ट तयार करता येणार आहे.