घरटेक-वेकमोबाईलच्या चार्जिंगची चिंता मिटली

मोबाईलच्या चार्जिंगची चिंता मिटली

Subscribe

आता मोबाईलच्या चार्जिंगची चिंता मिटली आहे. कारण सातत्याने घराबाहेर असणाऱ्यांसाठी सूर्यप्रकाशावर चालणारे सोलार पॉवर बँक नेटीजन्सच्या भेटीस आले आहे. अगदी कमी दरात हे सोलार पॉवर बँक बाजारात उपलब्ध झाले आहे.

प्रत्येक जण आजकाल सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतं. व्हॉटसअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक आणि हल्ली तरुणांमध्ये सगळ्यात जास्त वापरले जाणारे विविध गेम. या सर्वांचा वापर शक्यतो प्रवासा दरम्यान केला जातो. या सोशल मीडियाच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात मोबाईलची चार्जिंग देखील संपते. मात्र प्रवासात असल्यावर चार्जिंग लावणे देखील शक्य होत नाही. तसेच सतत घराबाहेर असणाऱ्या काही व्यक्ती पॉवर बँकचा देखील वापर करतात. मात्र त्या पॉवर बँकला देखील चार्जिंग केली जाते. त्यामुळे त्या पॉवर बँकच चार्जिंग संपल तरी अशावेळी मोबाईल आणि पॉवर बँक दोन्ही बंद होते. परंतु आता जर हे पॉवर बँक सोलारवर चालणारे असेल तर इंटरनेट वापरणाऱ्या व्यक्तींचा प्रश्न सुटला. सध्या पॉवर बँकचा वापरही वाढल्याचे लक्षात घेऊन सोलारवर चालणारे पॉवर बँक तयार करण्यात आले आहे. UBON या कंपनीने या सोलार बँकचे लॉंच केले असून हे लवकरच नेटीजन्सच्या वापरात येणार आहे.


पाहा – आजची पिढी सेलफोन आणि सोशल मीडियाची गुलाम !

- Advertisement -

असे असणार सोलार पॉवर बँक

स्मार्टफोन युजर्संची संख्या झपाट्याने वाढत असल्याने UBON या कंपनीने सोलार पॉवर बँक बाजारात आणले आहे. या पॉवर बँकची किंमत १ हजार २९९ रुपये एवढी आहे. UBON SL – 6067 हे पॉवर बँक काळा आणि पांढऱ्या अशा दोन रंगात उपलब्ध आहे. विशेष म्हणजे ही पॉवर बँक वेबसाईटवरुन देखील खरेदी करता येणार आहे. या पॉवर बँकला सिंगल आऊटपूट पोर्ट असून त्यासोबत एक वायर जोडलेली आहे. त्याचप्रमाणे त्यास v8 सॉकेट आणि युएसबी डॉकही देण्यात आले आहे. या पॉवर बँकसाठी प्लॅस्टीकचा ही वापर करण्यात आला असून १० वॅट पॉवरची क्षमता आहे. तसेच ग्राहकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. ओव्हरहोल्टेज प्रोटेक्शन, ड्यअल सेफ्टी सर्किट, ओव्हर टेम्परेचर प्रोटेक्शन, ओव्हरचार्ज आणि डिसचार्ज प्रोटेक्शन आणि सोबतच ब्लू चार्जिंग इंडिकेटर देण्यात आले आहे. तसेच या पॉवरची एक वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे.


वाचा – केंद्र सरकार सोशल मीडियावर पाळत ठेवणार नाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -