घरटेक-वेकएमजी ‘हेक्टर’ भारतात लॉन्च

एमजी ‘हेक्टर’ भारतात लॉन्च

Subscribe

एमजी (मॉरिस गॅरेज) मोटर्स इंडियाने आज आपली बहुप्रतिक्षित एसयूव्ही एमजी हेक्टर १२.१८ लाख ते १६.८८ लाख (एक्स शो-रूम, नवी दिल्ली) अशा अतिशय खास स्वागत मूल्यासह भारतीय बाजारपेठेत दाखल केली. भारताची पहिली इंटरनेट कार एमजी हेक्टर बरोबर खरेदीदारांना द ’एमजी शिल्ड’ हे भारतातील सर्वोत्तम व्हेइकल ओनरशिप पॅकेज दिले जाणार आहे. या पॅकेजद्वारे गाडीच्या खासगी मालकांना अमर्याद किलोमीटर्ससाठी ५ वर्षांची सर्वसमावेशक मॅन्युफॅक्चरर वॉरंटी मोफत दिली जाणार आहे. भारतात विकल्या जाणार्‍या इतर कोणत्याही गाडीबरोबर फॅक्टरी वॉरंटीच्या तुलनेत ही वॉरंटी सरस आहे. यामध्ये पाच वर्षांसाठी चोवीस तास रोडसाइड असिस्टंस (RSA) आणि पहिल्या पाच शेड्युल्ड व्हेइकल सर्व्हिससाठी शून्य मेहनताना या सुविधांचा समावेश आहे.

याखेरीज हेक्टरबरोबर प्रीपेड मेंटेनन्स प्लान्सही विकत घेता येऊ शकणार आहेत, ज्यांच्या किंमती पहिल्या तीन वर्षांसाठी अगदी कमी म्हणजे फक्त ६००० रुपयांपासून सुरू होणा-या आहेत. या गाडीची टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप (TCO) या उत्पादनश्रेणीतील इतर गाड्यांच्या तुलनेत सर्वात कमी म्हणजे पेट्रोल गाडीसाठी ४५ पैसे प्रती किलोमीटर आणि डिझेल गाडीसाठी ४९ पैसे प्रती किलोमीटर इतकी आहे.

- Advertisement -

एमजी कंपनीने उचललेले आणखी एक धाडसी आणि अभूतपूर्व पाऊल म्हणजे कंपनीकडून ग्राहकांना हेक्टर गाडीच्या पुनर्विक्रीमूल्याचीही हमी देण्यात आली आहे. यासाठी निर्माता कंपनीने कारदेखो या ऑटोमोटिव्ह पोर्टलशी हातमिळवणी केली असून त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ’’३-६०’’ योजनेअंतर्गत एमजी हेक्टर गाडी विकत घेऊन तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर या पोर्टलकडून ती ६०% अवशिष्ट मूल्याने (residual value) बायबॅक करेल. ग्राहकांचा अनुभव उंचावण्याच्या तसेच त्यांना संपूर्ण निश्चिंतता प्रदान करण्याच्या हेतूने ’’एमजी शिल्ड’’ योजनेला हे सर्व पैलू देण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -