युट्यूबवर प्यूडाईपाई नंतर टी-सीरीज नंबर-१ चॅनल

युट्यूबवर नंबर-१ चॉनल बनण्याचे यूद्ध हे काही महिन्यापासून वेगाने चालू आहे. प्यूडाईपाई (PewDiePie) हा चॅनल काही वर्षापासून पहिल्या नंबरवर होता. मात्र, आता ७८ हजार सब्सक्राइबर्सचा फरक ठेऊन भारतीय संगीत कंपनी टी-सिरीज चॅनल युट्यूबचा नंबर-१ चॅनल बनला आहे.

Mumbai
T series beat pudipie and become no.1 youtube channel
यूट्यूबवर प्यूडाईपाई नंतर टी-सीरीज नंबर-१ चॉनल

युट्यूबवर नंबर-१ चॅनल बनण्याचे यूद्ध हे काही महिन्यापासून वेगाने चालू आहे. पाच वर्ष पहिल्या नंबरवर असेलेल्या प्यूडाईपाई (PewDiePie) या युट्यूब चॅनलला आता भारतीय संगीत कंपनी टी-सीरीज चॅनलने मागे टाकला आहे. तसेच पहिल्या नंबरचा मान टी- सीरीज चॅनलने पटकावला आहे. काही आठवड्यापासून हे दोन्ही चॅनल पहिल्या नंबरवर बरोबरीला होते. मात्र, आता त्या दोघांमधील सब्सक्राइबर्समध्ये पुरेसा फरक आला आहे. एका अहवाला नुसार, युट्यूबवर टी-सीरीजचे ९१,८०१,६३९ सब्सक्राइबर्स आहेत. तर प्यूडाईपाई (PewDiePie) या युट्यूब चॅनलचे ९१,७२२,९५७ सब्सक्राइबर्स आहेत. आता या दोघांमध्ये ७८ हजार सब्सक्राइबर्सचा फरक आला आहे. त्यामुळे टी-सीरीज युट्यूबचा नंबर-१ चॅनल बनला आहे.

Subscribers
प्यूडाईपाई चॉनल आणि टी-सीरीज चॉनल सब्सक्राइबर्स

PewDiePie विरूद्ध टी-सीरीज

प्यूडाईपाई (PewDiePie) हा स्वीडनचा युट्यूबर आहे. त्याच नाव फीलिक्स कियलबर्ग असे आहे. या चॅनलवर कॉमेडी, गेम कॉमेंट्री, म्यूजिक आणि प्रतिक्रिया व्हिडिओ यासाठी जगभर ओळखला जातो. सुरूवातीला या चॅनलवर गेमिंग व्हिडिओ टाकण्यास सुरूवात केली होती. आता ते वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवतात आणि युट्यूबवर या व्हिडिओना पसंतीसुद्धा मिळते. काही वर्षांपासून प्यूडाईपाई (PewDiePie) हा चॅनल पहिल्या नंबरवर होता. सोशल मीडियावर या दोन्ही चॅनलचे चाहते प्रचार करत होतो. स्वीडनमध्ये त्या चॅनलचे जागोजागी पोस्टर्स लावून प्रचार सुरू होता. तसेच काही हॅकर्सने लोकांना हा चॅनल सब्सक्राइब करण्यासाठी सुद्धा सांगितले. तर भारतामध्ये सुद्धा अशाप्रकारे सोशल मीडियावर टी-सिरिजचा प्रचार केला होता.

व्हिडिओ व्यूजमध्ये टी-सीरीज नं-१

व्हिडिओ व्यूजमध्ये भारतीय टी- सीरिज चॅनल पहिल्या नंबरवर होता, प्यूडाईपाई (PewDiePie)या चॅनल अधिच मागे टाकले होते. टी- सीरीजला व्हिडिओ व्यूजमध्ये ५३ बिलियनपेक्षा जास्त व्यूज आहेत. तर प्यूडाईपाई (PewDiePie)चे १९ अब्ज व्यूज आहेत.