घरटेक-वेकप्रतीक्षा संपली: टाटा मोटर्सकडून एसयूव्ही- हॅरियरचे अनावरण

प्रतीक्षा संपली: टाटा मोटर्सकडून एसयूव्ही- हॅरियरचे अनावरण

Subscribe

टाटा मोटर्सने बुधवारी आपली बहुप्रतीक्षित एसयूव्ही, हॅरियर बाजारात आणली असून तिने एच५एक्स ही संकल्पना ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये प्रदर्शित केल्यापासून सर्वांना आकर्षित केले होते. हॅरियर ही गाडी भारतातील टाटा मोटर्सच्या सर्व अधिकृत विक्री आऊटलेट्समध्ये आजपासून उपलब्ध असेल.

ही एसयूव्ही ऑप्टिमल मोड्यूलर एफिशियन्ट ग्लोबल अ‍ॅडव्हान्स्ड (ओमेगा) आर्किटेक्चरवर उभारण्यात आली असून ती विविध प्रकारच्या प्रदेशांमध्ये सुलभ ड्रायव्हिंगचा आनंद देते. हॅरियर ही पहिली गाडी आहे जिने टाटा मोटर्सची इम्पॅक्ट डिझाइन २.० डिझाइन भाषा समोर आणली आहे.

- Advertisement -

या उत्पादनाच्या अनावरणाच्या निमित्ताने बोलताना टाटा मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक गंटेर बुटशेक म्हणाले की, २०१९ च्या सुरुवातीला भारतीय बाजारपेठेत आणण्याचे वचन आम्ही दिल्ली ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये एच५एक्स ही संकल्पना प्रदर्शित केली. या उत्पादनासोबत, टाटा मोटर्सने प्रीमियम मध्यम आकाराच्या एसयूव्ही विभागात प्रवेश केला आहे. हॅरियर ही गाडी आमच्या टर्नअराऊंड २.० धोरणाचा एक उत्तम पुरावा आहे आणि ती बाजाराचे रूप पूर्णपणे पालटून टाकेल.

टाटा मोटर्सचे नवीन इम्पॅक्ट डिझाइन २.० लक्ष वेधून घेते. प्रमाणबद्धता आणि आकर्षक पृष्ठभाग यांच्यामुळे एसयूव्हीचा खरा पवित्रा, रस्त्यावरील देखणे अस्तित्व आणि वेगळेपणाची भावना या सर्व गोष्टी मिळतात. समकालीन एसयूव्ही डिझाइन प्रमाणांसोबत हॅरियर या गाडीत फ्लोटिंग रूफ बोल्ड क्रोम फिनिशरसोबत, वर आलेले व्हील आर्चेस, ड्युएल फंक्शन एलईडी डीआरएल्स आहेत आणि त्यामुळे तिचे एकूणच बोल्ड रूप आणखी सुंदर दिसते. गाडीचे इंटिरियर अत्यंत स्वच्छ, कोणतीही गर्दी नसलेले आहे आणि स्टाईल आणि प्रॅक्टिकल वापर यांचे संतुलन त्यात साधण्यात आले आहे. उच्च दर्जाच्या साहित्याचा वापर आणि रंगसंगती यांच्यामुळे जास्त चांगला अनुभव मिळतो आणि त्यामुळे आंतररचना प्रीमियम आणि ऐषारामी दिसते. हॅरियर ही गाडी चार प्रकारांमध्ये उपलब्ध असेल- एक्सई, एक्सएम, एक्सटी, एक्सझेड आणि त्यात पाच आकर्षक रंग आहेत- कॅलिस्टो कॉपर, थर्मिस्टो गोल्ड, एरियल सिल्व्हर, टेलेस्टो ग्रे आणि ऑर्कस व्हाईट.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -