५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत घ्या फिटनेस ट्रॅकर

New Delhi
tech news top spo2 fitness monitor wearable below rs 5000 here is list
५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत घ्या फिटनेस ट्रॅकर

मागील काही वर्षात भारतातील स्मार्ट विअरेबल इंडस्ट्रीमध्ये खूप बदल झाले आहेत. पहिल्यांदा फिटनेस ट्रॅकर्स फक्त युझर्सचे स्टेप काउंट करणे यापुरतीच मर्यादित होते. आता लेटेस्ट फिटनेस ट्रॅकरमध्ये हेल्थ रेट मॉनिटर, ऑक्सिजन सॅच्युरेशन (SpO2)मॉनिटर, कॅलरी आणि स्लीप मॉनिटर सारखे फीचर्स येत आहेत. याच्या मदतीने दररोज युझर्स त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतात. त्यामुळे आज आपण सध्या पाच हजार रुपयांपेक्षा SpO2 मॉनिटर असलेले टॉप विअरेबल फिटनेस ट्रॅकर पाहणार आहोत.

Realme Watch

या स्मार्टवॉचमध्ये रिअर टाईम SpO2 मॉनिटर आहे. रिअलमी वॉच कॉम्प्रिहेंसिव हेल्थ फिचर सारखे बल्ड-ऑक्सिजन लेव्हल (SpO2) आणि Goodix चे टॉप लेव्हल पीपीजी हार्ट रेट सेंसर सारखे फिचर्स यामध्ये आहेत. डिव्हाइस १४ वेगवेगळ्या स्पोर्ट मोडद्वारे आपल्या शारीरिक हालचालींचे परीक्षण करेल. याव्यतिरिक्त वॉकिंग आणि रनिंग याच्यावर देखरेख असेल. रिअलमी वॉचची किंमत ३ हजार ९९९ रुपये आहे.

Honor 5i Band

या बँडमध्ये दैनंदिन वर्कआऊट्सचे हाय-प्रिसाइज रिडिंग AI ड्राइव्ह अल्गोरिदम फिचर दिले गेले आहे. Huawei च्या TruSeen 3.0ची ऑफर दिली असून यामध्ये यूजर्स २४ तास आपले हार्ट रेट ट्रॅक करू शकतो. तसेच डिव्हाइसमध्ये SpO2 मॉनिटर दिला आहे, जो ऑक्सिजन लेव्हल ट्रॅक करू शकेल. या बँडची किंमत २ हजार ९९९ रुपये आहे. हा बँड Meteorite Black, Olive green आणि Coral Pink कलर ऑप्शन मध्ये येईल.

Huawei Band 4

Huawei Band 4 मध्ये एकूण ९ व्यायाम पद्धती असतील. ज्यामध्ये ऑऊटडोर रनिंग, आऊटडोर वॉक, इनडोर सायकलिंगचा समावेश आहे. या देखील बँडमध्ये SpO2 मॉनिटर दिला आहे. Honor सारखंच Huawei Band 4 मध्ये TruSeen ऑफर दिली गेली आहे, ज्यामध्ये युझर्स हार्ट रेट, स्लीपिंग मॉनिटर आणि स्लीम डिटेक्टर दिले आहे. हा बँडमध्ये Sakura Pink, Amber Sunrise आणि Graphite या तीन कलर ऑप्शन आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here