घरटेक-वेकया आठवड्यात Redmi 9 Prime भारतात होणार लाँच

या आठवड्यात Redmi 9 Prime भारतात होणार लाँच

Subscribe

शाओमी (Xiaomi)चा सबब्रँड रेडमीने आपला बजेट स्मार्टफोन सीरिज Redmi 9 Prime ला या आठड्यात ४ ऑगस्टला भारतात लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन ६ ऑगस्टपासून Amazon Prime Day Sale मध्ये उपलब्ध होणार आहे. याबाबत शाओमी इंडियाचे ग्लोबल व्हाईस प्रेसिडेंट मनु कुमार जैनी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे. गेल्या माहिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आलेला Redmi 9 सीरिजचा रिब्रांडेड व्हर्जन असेल. कंपनी हा स्मार्टफोन १० हजार रुपयांच्या किंमतसह भारतात लाँच करू शकते. Realme C11 सोबत यांची स्पर्धा असेल.

- Advertisement -

लाँच संदर्भात माहिती

Redmi 9 Prime ४ ऑगस्ट रोजी ई-कॉमर्स वेबसाईट Amazon Indiaवर लाँच केला जाणार आहे. याच दिवशी १२ वाजता ई-कॉमर्स वेबसाईट व्यतिरिक्त कंपनीच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही लाँच केला जाईल. हा स्मार्टफोन व्हर्च्युअल इव्हेंटद्वारे देखील लाँच केला जाईल. तसेच Amazon India व्यतिरिक्त कंपनीच्या अधिकृत ई-स्टोअर्स आणि ऑफलाईन स्टोअरच्या माध्यमातून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल.

- Advertisement -

मोठा डिस्प्ले

Redmi 9 Prime मध्ये ६.५३ इंचचा फुल एचडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच फीचर दिले जाऊ शकते. याचे रिजोल्यूशन 1,080 X 2,340 पिक्सलसह येऊ शकते.

प्रोसेसर

Redmi 9 Prime मध्ये प्रोसेसर MediaTek गेमिंग प्रोसेसर Helio G80 SoC सह येऊ शकते. फोनमध्ये ऑक्टोकर प्रोसेसरचा वापर केला जाऊ शकतो. तसेच फोन 3GB रॅमच्या ऑप्शनसह येऊ शकतो.

क्वाड रियर कॅमेरा

फोनच्या बॅकला क्वाड रियर कॅमेरा सेट अप दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 13MP प्राइमरी सेंसर दिला जाऊ शकतो. याशिवाय फोनमध्ये 8MP + 5MP + 2MPचे इतर तीन कॅमेरे दिले जाऊ शकतात आणि सेल्फीसाठी 8MP कॅमेरा दिला जाऊ शकतो.

बॅटरी

फोनमध्ये 5,020mAh ची दमदार बॅटरी दिली जाऊ शकते. याशिवाय फोन USB Type-C आणि फास्ट चार्जिंग फीचरसह येऊ शकतो. Android 10 वर आधारित कस्टमाइज्ड MIUI सह फोन येऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -