घरटेक-वेकRealme X3 स्मार्टफोन २५ जूनला लाँच होणार; फ्लिपकार्टवरुन विक्री

Realme X3 स्मार्टफोन २५ जूनला लाँच होणार; फ्लिपकार्टवरुन विक्री

Subscribe

रियलमी स्मार्टफोन कंपनी एक्स सीरीजमधील Realme X3 हा स्मार्टफोन २५ जूनला लाँच करणार आहे. फ्लिपकार्टवर या फोनची विक्री होणार आहे. ई-कॉमर्स साइटने फोन लाँच करण्यासाठी समर्पित मायक्रोसाईट तयार केली आहे. Realme X3 आणि X3 सुपरझूम २५ जून रोजी भारतात लाँच होणार आहेत. लाँचिंगसाठी एक ऑनलाइन कार्यक्रम ठेवण्यात आला असून १२.३० वाजता सुरू होणार आहे. Realme X3 SuperZoom ची ग्लोबल लाँचिंग यापूर्वी केली गेली आहे.

Realme X3 SuperZoomच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर यात ६.६ इंचाचा फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी मागील बाजूस 64MP प्रायमरी कॅमेरा, 8MP वाईड एंगल कॅमेरा, 8MP पेरिस्कोप लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. यात 60X डिजिटल झूम सपोर्ट देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 32MP प्राइमरी कॅमेरा, 8MPचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. 4,200mAh बॅटरी देण्यात आली आहे.

- Advertisement -

 

Realme X3 फोनमध्ये ६.६ इंचाचा Super AMOLED डिस्पले देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855+ सह Octa core 2.96 GHz प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी मागील बाजूस 16MP कॅमेरा प्रायमरी कॅमेरा, 8MP वाईड एंगल कॅमेरा देण्यात आला आहे. 4,200mAh बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किमत १६,९९९ रुपये आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राहुल गांधींच्या प्रश्नावर भाजपचा पलटवार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -